हर्षल, श्रुष्टी, दिव्या मुंबई विद्यापीठाच्या संघात

या तिघी ठाण्यातील वसंत विहार स्कुलच्या खेळपट्टीवर रायझिंग प्लेयर्स क्रिकेट क्लबमध्ये आशिष मोरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सर्व करतात.

ठाणे : आगामी पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे . भुवनेश्वर येथे केएचटी विद्यापीठ आयोजित , १० ते १८ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धकरता ठाण्यातील तिघींची मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या हर्षल जाधव ,दिव्या परब आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत झुनझुनवाला महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणारी श्रुष्टि नाईक या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. या तिघी ठाण्यातील वसंत विहार स्कुलच्या खेळपट्टीवर रायझिंग प्लेयर्स क्रिकेट क्लबमध्ये आशिष मोरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सर्व करतात.
हर्षलने विभागीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत एकूण १३६ धावांसह स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचे पारितोषिक पटकावले होते. तर श्रुष्टी नाईकने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत १२३ धाव आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. याशिवाय श्रुष्टीने मुंबई क्रिकेट संघटनेच्या अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात ५१ धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी करत आपली दाखल घ्यायला लावली होती. दिव्या प्रबची संघात यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. दिव्याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत चार यष्टिचित आणि यष्टीपाठी सहा झेल पकडून संघातील आपले स्थान निश्चित केले.
मुंबई विद्यापीठाचा संघ : सौम्य सिंग (युपीजीडी ), हर्षल जाधव (जोशी बेडेकर महाविद्यालय), श्रुष्टी नाईक (झुनझुनवाला महाविद्यालय), श्वेता कलपथी (एन.एल. दालमिया महाविद्यालय),रिद्धी सिंग, कोमल जाधव ( दोन्ही झुनझुनवाला महाविद्यालय), जया नेगी, दिशा चांडक ,रिया साळुंके, पुर्वा केंडे, हर्षित सैनी (सर्व खालसा महाविद्यालय), दिव्या परब (जोशी बेडेकर महाविद्यालय), उल्का पाटील ( व्हिवा महाविद्यालय).

 5,035 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.