हेमंत बुचडे, विकी पाटील चमकले

वाशी वॉरियर्सने दिलेले १४८ धावांचे आव्हान ठाणे टायगर्स संघाने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर १४९ धावा करत विजय नोंदवला.

ठाणे : हेमंत बुचडेची अचूक टप्प्यावरील गोलंदाजी आणि विकी पाटीलच्या आक्रमक फलंदाजींच्या जोरावर ठाणे टायगर्स संघाने वाशी वॉरीयर्स संघाचा सात विकेट्सनी पराभव करत माझगाव क्रिकेट क्लब आयोजित नवी मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आश्वासक वाटचाल कायम ठेवली. वाशी वॉरियर्सने दिलेले १४८ धावांचे आव्हान ठाणे टायगर्स संघाने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर १४९ धावा करत विजय नोंदवला. नाबाद ६६ धावांची खेळी करत ठाणे टायगर्सला विजयी करणाऱ्या विकी पाटीलला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना वाशी वॉरियर्स संघाने २० षटकात ६ बाद १४८ धावांचे आव्हान उभे केले ते धृमिल मटकर, हृषिकेश पवार आणि प्रसाद पवारच्या फलंदाजीच्या जोरावर. धृमिलने ३६ चेंडूत ४७, हृषिकेशने ३१ आणि प्रसादने २७ धावा केल्या. हेमंत बुचडेने २९ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. विकी भोईर आणि परिक्षित वळसंगकरने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
उत्तरादाखल विकी पाटील आणि परिक्षित वळसंगकरने आक्रमक फलंदाजी करत संघाचा विजय साकारला. विकीने नाबाद ६६ धावांची अर्धशतकी खेळी ५४ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारानिशी साकारली. परिक्षितने ३९ चेंडूत ४२ धावा केल्या. गोपेंद्र बोहरा, हृषीकेश पवार आणि सिध्दांत सिंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : वाशी वॉरियर्स : २० षटकात ६ बाद १४८ ( धृमिल मटकर ४७, हृषिकेश पवार ३१, प्रसाद पवार २७, सिध्दांत सिंग १९, हेमंत बुचडे ४-२९-३, विकी भोईर ४-३२-१, परिक्षित वळसंगकर ४-३३-१) पराभुत विरुद्ध ठाणे टायगर्स : १९.५ षटकात ३ बाद १४९ ( विकी पाटील नाबाद ६६, परिक्षित वळसंगकर ४२, गोपेंद्र बोहरा २.५- ३०- १, हृषिकेश पवार ४-२०-१, सिध्दांत सिंग ३-२५-१). सामनावीर – विकी पाटील.

 7,280 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.