मराठी भाषेला मरण नाही

इतर भाषेतील मराठीत भाषांतर झालेलं साहित्य विद्यार्थी, युवकांना वाचण्याठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता असल्याचे व्यक्त केले मत

ठाणे : समाजमाध्यमांच कितीही आक्रमण झालं तरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शैक्षणिक आणि अवांतर वाचनासाठी मराठी पुस्तकांसाठी येणारी विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यावर मराठी भाषेला मरण नाही असा ठाम विश्वास जोशी- बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि महितीशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक नारायण बारसे यांनी व्यक्त केला. स्वराज सामाजिक संस्था, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि श्री कृष्णा प्रकाशन तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात प्राध्यापक नारायण बारसे बोलत होते.
ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात असणाऱ्या खुल्या कलादालनात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मातृभाषेत बोलणाऱ्या जनसमुदायात मराठीचा सातवा क्रमांक लागतो. जगातील ६५ देशांमध्ये मराठीत संवाद साधला जातो. त्यामुळे मराठी भाषेचा ऱ्हास होणार नसला तरी त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे. इतर भाषेतील मराठीत भाषांतर झालेलं साहित्य विद्यार्थी, युवकांना वाचण्याठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता असल्याचे मत बारसे यांनी यावेळी व्यक्त केले. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठीतील सुमारे तीनशेहून जास्त पुस्तके मांडण्यात आली आहेत. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान – ठाणे केंद्र अध्यक्ष मुरलीधर नाले, अनघा प्रकाशनचे अमोल नाले, खुल्या कलादालनाचे संकल्पक महेश कोळी, स्वराज सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण आणि इतर पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 14,699 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.