ऍग्रीब्रीड क्रिकेट क्लबची विजयी आगेकूच कायम

२५ धावांत ३ विकेट्स मिळवणारा विरेंद्र यादव सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.

मुंबई : ऍग्रिब्रीड क्रिकेट क्लबने रायझिंग प्लेयर्स संघाचा सात विकेट्सनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेतील विजयी आगेकूच कायम ठेवली. २५ धावांत ३ विकेट्स मिळवणारा विरेंद्र यादव सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.
ऍग्रिब्रीडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत रायझिंग प्लेयर्स क्रिकेट क्लबला १०१ धावांत गुंडाळले. फरहाद खानने २३, रोहिन शेखने १८ आणि जतीन जेठवाने १४ धावा केल्यामुळे रायझिंग प्लेयर्स क्रिकेट क्लबला शतकी धावसंख्या उभारता आली. विरेंद्र पाठोपाठ रोहित शुक्ला, सागर मिश्रा आणि सय्यद सकलेनने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना अजित यादवने ४४ धावांची खेळी करत संघाला विजयाचे दार उघडून दिले. ऍग्रिब्रीड क्रिकेट क्लबने १२.५ षटकात ३ बाद १०७ धावा करत विजय नोंदवला. सागर मिश्राने २५ आणि प्रतीक घरतने २० धावांचे योगदान दिले. फरहाद खान, चिन्मय पाटील आणि रोहिन शेखने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : रायझिंग प्लेयर्स क्रिकेट क्लब : १८.५ षटकात सर्वबाद १०१ ( फरहाद खान २३, रोहिन शेख १८, जतीन जेठवा १४, विरेंद्र यादव ४-२५-३, रोहित शुक्ला २.५-११-२, सय्यद सकलेन २-१०-२, अजिंक्य बालकाटे ३-१३-१) पराभुत विरुद्ध ऍग्रीब्रीड क्रिकेट क्लब :१२.५ षटकात ३ बाद १०७ ( अजित यादव ४४, सागर मिश्रा २५, प्रतीक घरत २०, फरहाद खान ३-२१-१, चिन्मय पाटील ४-२०-१, रोहिन शेख २-२४-१). सामनावीर – विरेंद्र यादव

 136 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.