नांदेडच्या वाजिद पाशाचा रोमहर्षक विजय

पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अनिल मुंढेंचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १३-२५, २१-०, २३-२२ असा चुरशीचा विजय मिळविला.

मुंबई : शिव शंकर उत्सव मंडळ यांच्यावतीने तसेच सहकार ग्रुप, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, न्यू इंडिया आश्युरन्स, भारत पेट्रोलियम व बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील पहिल्या फेरीत नांदेडच्या वाजिद पाशाने पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अनिल मुंढेंचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १३-२५, २१-०, २३-२२ असा चुरशीचा विजय मिळविला. तत्पूर्वी मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी युवा सेनेचे उपसचिव सिद्धेश सुनील शिंदे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार, मानद सचिव यतिन ठाकूर, शिव शंकर उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्यवाह जितेंद्र चव्हाण, सचिव प्रवीण चौधरी, स्पर्धा प्रमुख कृष्णकांत परब आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष एकेरी पहिल्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
संजय पात्रे ( मुंबई ) वि वि संदेश वरघडे ( ठाणे ) १४-२२, २५-१४, २५-१२, अलंकार नाईक ( मुंबई ) वि वि अमीन कुरेशी ( मुंबई उपनगर ) १५-२१, २५-६, २५-०, संतोष सावंत ( मुंबई ) वि वि जयेश कांबळे ( मुंबई उपनगर ) २२-९, २५-१, दीपक वाघ ( मुंबई ) वि वि ओजस जाधव ( मुंबई ) २५-२, ११-२५, १८-१६, महेश रायकर ( मुंबई ) वि वि ईश्वर चव्हाण ( मुंबई ) १३-२५, २५-१९, २५-५, प्रताप सावंत ( पालघर ) वि वि धनंजय खवरे ( मुंबई ) १३-२५, २५-६, २५-०

 249 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.