ठाण्यात गौरव जोशींच्या टॉक शोचे आयोजन

गतवर्षी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतिय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजय आणि ऑस्ट्रेलियातील एकंदरीत क्रिकेट याबाबत विश्लेषण करणार आहेत.

ठाणे : आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात प्रथमच ऑस्ट्रेलियास्थित क्रिकेट समालोचक आणि समीक्षक गौरव जोशी यांच्या टॉक शो चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १ मार्च रोजी होणाऱ्या या टॉक शो मध्ये गौरव जोशी गतवर्षी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतिय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजय आणि ऑस्ट्रेलियातील एकंदरीत क्रिकेट याबाबत विश्लेषण करणार आहेत.हा कार्यक्रम आनंद भारती समाजाच्या सभागृहात संध्याकाळी ६.३० ते ८ दरम्यान होईल. गौरव जोशी हे जन्माने ठाणेकर असून सध्या ते ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. गौरव जोशी यांनी महाराष्ट्रासह देश विदेशातील अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखन आणि वृत्तवाहिन्यांकर्ता समालोचन आणि समीक्षकाची भूमिका पार पाडली आहे. टिम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील पहिल्या मालिका विजयातील क्रिकेटपटूंच्या कामगिरीची गौरवगाथा असलेल्या मिरॅकल मेकर्स – इंडियन क्रिकेट ग्रेटेस्ट इपीक ( ऑस्ट्रेलियात चमत्कार घडवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूनची यशोगाथा) गौरव जोशी आणि भारत सुदर्सन लिखित पुस्तकाचे क्रिकेट वर्तुळात चांगले स्वागत झाले आहे.

 21,493 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.