विकासकासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा


मृत कामगारांच्या नातेवाईकांना किमान २५ लाख रुपये मदत व योग्य ती कायदेशीर नुकसान भरपाई देण्याची शहर काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिदे यानी केली मागणी.

ठाणे :  २३फेब्रु रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास बीकेबीन, नौपाडा,येथील सत्य नीलम इमारतीच्या पायाच्या ठिकाणी काम चालू असताना मातीचा मोठा ढिगारा पडून दोन कामगार मृत्युमुखी पडले असून एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेला जबाबदार वास्तुविशारद,विकासक व सबधित ठामपा अधिका-यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिदे यानी केली आहे.
ठाणे पोलीस आयुक्त यांना दिलेल्या पत्रकात त्यांनी सागितले की, कायद्यानुसार बांधकामास परवानगी दिल्यानंतर सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी विकासकाची आहे.तसेच त्याची तपासणी,नियमन करुन अशा यंत्रणेत त्रुटी असल्यास संबंधित विकासकावर कारवाई करण्याची जबाबदारी ठाणे म.न.पा चे संबंधित अधिकाऱ्यांची आहे,परंतु अनेक वेळा वरीलप्रमाणे घडलेल्या अपघातानंतर संबंधित साईटवरील ठेकेदार वा इतर काही जणांवर थातूरमातूर गुन्हे दाखल करून अशा प्रकरणास जबाबदार असणाऱ्याना मोकळे सोडले जात असल्याचा आरोप सचिन शिंदे यांनी केला.
        त्यामुळे काल घडलेल्या अपघातात विकासकाची बेपर्वाई आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष हेच बांधकाम कामगारांच्या मृत्युचे खरे कारण असल्याचे सांगत विकासकाने कामगारांना पुरवलेल्या सुरक्षितता यंत्रणेचे नियमन,तपासणी करुन संबंधित विकासकासह वास्तुविशारद व त्रुटीबाबत कारवाईची जबाबदारी असणारे प्रभाग समिती उपायुक्त शंकर पाटोळे,कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व मृत कामगारांच्या नातेवाईकांना किमान २५ लाख रुपये मदत व योग्य ती कायदेशीर नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी पोलिस आयुक्ताकडे दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे

 25,841 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.