शोएब सय्यदचा विकेट्सचा षटकार

अमन फारुकी आणि सुजय ठक्करने दुसऱ्या विकेटसाठी केलेली द्विशतकी भागीदारी, शोएब सय्यदच्या सहा विकेट्सच्या जोरावर विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने फायझर स्पोर्ट्स क्लबचा २७८ धावांनी धुव्वा उडवला.

मुंबई : अमन फारुकी आणि सुजय ठक्करने दुसऱ्या विकेटसाठी केलेली द्विशतकी भागीदारी, शोएब सय्यदच्या सहा विकेट्सच्या जोरावर विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने फायझर स्पोर्ट्स क्लबचा २७८ धावांनी धुव्वा उडवत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मोठा विजय मिळवला. विहंग ग्रुप क्रिकेट क्लबच्या ३०२ धावांच्या आव्हानासमोर फायझर स्पोर्ट्स क्लबचा डाव अवघ्या २४ धावांत आटोपला.
अमन फारुकी (१०१) आणि सुजय ठक्करच्या (१०६) २१६ धावांच्या भागीदारीमुळे विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने २० षटकात ४ बाद ३०२ धावांचा डोंगर उभारला. अल्तामसने ४२ धावा केल्या. मोहनिश वैद्य आणि दर्शक भगतने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल शोएब सय्यदच्या भेदक माऱ्यासमोर फायझर स्पोर्ट्स क्लबचा डाव फक्त २४ धावांवर आटोपला. शोएबीच्या प्रभावी गोलंदाजीमुळे फायझरचे सहा फलंदाज खात न खोलता बाद झाले. मनीष मिश्राने सर्वाधिक १० धावा केल्या. शोएबने ३ निर्धाव षटकांसह ५ धावांत ६ फलंदाज बाद केले. दिपक विश्वकर्माने दोन, निपुण पांचाळ आणि मजिद कुरेशीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : विहंग ग्रुप क्रिकेट क्लब : २० षटकात ४ बाद ३०२ ( अमन फारुकी १०१, सुजय ठक्कर १०६, अल्तामस ४२, मोहनिश वैद्य ३-२०-१, दर्शन भगत २-२९-१) विजयी विरुद्ध फायझर स्पोर्ट्स क्लब : १३.२ षटकात सर्वबाद २४( मनिष मिश्रा १०, शोएब सय्यद ४-३-५-६, दिपक विश्वकर्मा २.२- ५-२, निपुण पांचाळ ३-१-४-१, मजिद कुरेशी ४-१-९-१). सामनावीर – शोएब सय्यद.

 214 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.