शिवशंकर तर्फे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

२४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके शिवशंकर उत्सव मंडळाच्यावतीने देण्यात येणार.

ठाणे : शिवशंकर उत्सव मंडळाच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड, मुंबई येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके शिवशंकर उत्सव मंडळाच्यावतीने देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या वेबसाईटवर उपलब्ध असून इच्छुक खेळाडूंनी भाग घेण्यासाठी आपली नावे जिल्हा संघटनेमार्फत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे १७ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई येथे नोंदवावीत.

 23,475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.