आहेर यांच्यावर कारवाई व्हावी

ठाणे शहर कॉंग्रेसची मागणी

ठाणे : राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषिवलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्याबाबत जे काही वक्तव्य केले आहे, त्याची सत्यता तपासली गेली पाहिजे तसेच आहेर यांना पाठीशी घालणा-यांचा शोध घेऊन आहेर यांच्यासह त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी ठाणे शहर कॉंग्रेसच्या वतीने प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे यांनी केली आहे.
ठाणे महापालिका अधिकारी महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयासमोर झालेल्या हल्ल्या संदर्भात कॉंग्रेसने आपली भुमिका स्पष्ट केली आहे,सचिन शिंदे यांनी सागितले की,आहेर यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही परंतु ही मारहाण का झाली? याचाही परामर्श घेणे गरजेचे आहे, गेल्या अनेक वर्षांपासून महेश आहेर यांच्यावर अनाधिकृत बांधकाम, सार्वजनिक मालमत्ता, धमकावणे असे विविध आरोप होत आहे, त्यांची विभागीय चौकशी सुरु असतांना ते त्याच विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. कोणाच्या आर्शिवादाने त्यांच्याकडे या विभागाचा कार्यभार देण्यात आला? असा सवालही यावेळी सचिन शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
एक वर्षांपूर्वीही ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महेश आहेर यांच्यामार्फत घाटकोपर येथे बोलावून धमकावण्यात आल्याचा आरोप केला होता त्याची तक्रारही पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही त्यावर राहिलेल्या अधिका-याची साधी चौकशीही होत नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आव्हाड यांनी केलेल्या ४० लाखाच्या वक्तव्याची सत्यता पडताळून पाहीली पाहीजे अशी मागणी देखील त्यांनी केली.
महेश आहेर याच्या चौकशा सुरु असतांना उलट त्या बदल्यात विविध पदांची बक्षीसी मिळवायची हेच उद्योग सुरु असून आहेर यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली.

 22,489 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.