महारेराने रिअल इस्टेट एजंट ट्रेनिंगच्या पहिल्या बॅचचे केले उद्घाटन

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) हे प्रशिक्षण प्रदान करणार, महारेरा नोडल अधिकाऱ्यांनी रिअल इस्टेट एजंट्सना दिली मौलिक माहिती

ठाणे : भारत सरकारची गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या छत्रांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (नरेडको) रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या (रेमि) सहयोगाने महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी (महारेरा) उपक्रमांतर्गत रिअल इस्टेट एजंट्सच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
अलिकडेच महारेरातर्फे नवा निर्देश देण्यात आला होता. या निर्देशानुसार सर्व चॅनल पार्टनर्सना आणि प्रॉपर्टी एजंट्ना व्यावसायिक सेवा प्रदान करणे सुरू करण्याआधी परीक्षा देणे व संबंधित प्रशासनाकडून प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले होते. १० जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, “१ मे २०२२ पासून ज्या रिअल इस्टेट एजंट्सकडे वैध महारेरा रिअल इस्टेट एजंट योग्यता प्रमाणपत्र असेल तेच महारेरा रिअल इस्टेट एजंट रजिस्ट्रेशन/रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण यासाठी अर्ज करू शकतात.
वर दिलेल्या कलम (अ) मध्ये दिलेल्या आदेशानुसार हे पुढील व्यक्तींना लागू असेल : व्यक्तींचा विचार करता सर्व रिअल इस्टेट एजंट्स आणि फर्म/कंपनी/संस्था (व्यक्ती वगळता) यांच्या बाबतीत अधिकृत स्वाक्षरीकर्ते (महारेरा रिअल इस्टेट एजंट रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करण्यास अधिकृत असलेल्या व्यक्ती). रिअल इस्टेट एजंट्सच्या फर्म्स/कंपन्या/संस्थांमध्ये कोणत्याही पदनामाने काम करणारे सर्व कर्मचारी/स्टाफ/अधिकारी, जे रिअल इस्टेट प्रकल्पांचे व्यवहार प्रत्यक्षात आणण्यासाठी गृहखरेदीदार / अलॉटीज (ज्यांना सदनिका वाटप झाले आहे) यांच्याशी संवाद साधतात.
हा २० तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम असून यामध्ये प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम सोमवार ते शुक्रवार चालणार असून दर दिवशी चार तासांचे सत्र घेण्यात येईल. या कार्यक्रमाची पहिली बॅच १५ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.
महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (महारेरा) निश्चित केलेली मार्गदर्शक तत्वे व नियमावलीविषयी रिअल इस्टेट एजंट्सना माहिती देणे आणि प्रशिक्षित करणे हा या कार्यक्रमाचा प्राथमिक हेतू आहे. रिअल इस्टेटच्या व्यवहारांमध्ये खरेदीदार व विक्रेते यांचे परिणामकारकपणे प्रतिनिधीत्व करण्यासाठी रिअल इस्टेट एजंट्सना आवश्यक ज्ञान व कौशल्ये प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणामुळे एजंट्सना मार्केटची समज येते आणि रेरामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात झालेले बदल समजतात. प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नरेडको-रेमि यांच्यातर्फे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळते.
माजी आयएएस अधिकारी आणि महारेराचे नोडल अधिकारी संजय देशमुख यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात रिअल इस्टेट एजंटच्या बॅचसमोर मौल्यवान बारकावे विषद केले.
या प्रसंगी नरेडकोचे अध्यक्ष राजन बांदेलकर म्हणाले, “रिअल इस्टेट एजंट्ससाठी असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग झाल्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. महारेराने उचललेले हे पाऊल योग्य दिशेने टाकलेले आहे आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्व भागधारकांसाठी हे महत्त्वाचे असेल. यामुळे रिअल इस्टेट एजंट्सच्या कार्यशैलीत अधिक पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा येईल. कारण ते घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतात. जाणकार एजंट गृह खरेदीदारांशी संपर्क साधेल, त्यांचा विश्वास प्राप्त करेल आणि त्याला घर घेण्यासंदर्भात माहितीवर आधारित निर्णय घेण्यास मदत करेल.”
रेमिच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख पुनित चोवाटिया म्हणाले, “अनेक विकसित देशांमध्ये प्रोफेशनल प्रॅक्टिस सुरू करण्याआधी रिअल इस्टेट एजंटनी प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक कार्यक्षमता व व्यावसायिकता आणण्यासाठी महारेराने उचललेले हे एक उत्तम पाऊल आहे.”
महारेरा रिअल इस्टेट एजंट प्रमाणपत्र परीक्षेसाठी रिअल इस्टेट एजंट्सना तयार करून याचा त्यांना लाभ होणार आहे. महारेरातील कलमांची समज येण्यासाठी या क्षेत्रातील काम करणाऱ्यांसोबत नेटवर्क विस्तारण्यास त्यांना मदत होईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या रिअल इस्टेट एजंटसाठी पात्रता निकष आहेत. यात महारेरा नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट्स, महारेरामध्ये नोंदणी न केलेले नवीन रिअल इस्टेट एजंट आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील ज्या प्रोफेशनल्सना महारेरा रिअल इस्टेट एजंट व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे.
रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (रेमि) ही भारतातील आघाडीची शैक्षणिक संस्था आहे जी रिअल इस्टेट क्षेत्रातील अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. रेमितर्फे सध्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम, कस्टमाइझ प्रशिक्षण कार्यशाळा आणि इतर व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येते. रेमितर्फे जागतिक दर्जाच्या कार्यपद्धती, जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम आणि अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेट मॅनेजमेंटसोबत (IREM®️) केलेल्या सहयोगाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देण्यात येते. आयआरईएम नवोदित, सुरुवातीच्या टप्प्यातील प्रोफोशनल्स, उद्योजक आणि लीडर्सना या सतत बदलत्या नियमांशी जुळवून घेण्यास सक्षम करते.

 719 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.