हर्ष गुप्ता ठरला ज्यूनियर मुंबई श्री

मास्टर्स गटात अमित सिंग, संजय माडगावकर, प्रमोद जाधव अव्वल

मुंबई : मुंबई शरीरसौष्ठवातील ज्यूनियर्ससाठी स्फूर्तीदायक असलेल्या ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेत भारत हेल्थ स्पाच्या हर्ष गुप्ताने आकर्षक पीळदार देहयष्टी आणि लक्षवेधी पोझेस मारून अिंजक्यपद पटकावले. मास्टर्स गटात अमित सिंग (४० ते ५० वर्षे), संजय माडगावकर (५० ते ६० वर्षे) आणि प्रमोद जाधव (६० वर्षावरील) यांनी बाजी मारली. दिव्यांगांच्या गटात वर्ल्डवाईडचा महबूब शेख अव्वल आला. तसेच ज्यूनियर मेन्स फिजीकच्या गटात शिकाप बेग आणि सोहैल इद्रिसी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत जेतेपदाला गवसणी घातली.
आर्थिक संकटामुळे वारंवार लांबणीवर पडत असलेल्या ज्यूनियर मुंबई श्रीला महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस विक्रम रोठे आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी आधार दिल्यामुळे दिमाखदार झालेल्या ज्यूनियर मुंबई श्रीमध्ये सुमारे १६५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
मास्टर्सने केली कमाल
ज्यूनियर मुंबई श्रीच्या मंचावर मास्टर्स खेळाडूंनी अक्षरशा धम्माल उडवली. ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षावरील अशा तिन्ही गटात सुमारे ४८ खेळाडू उतरल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांची पीळदार देहयष्टी पाहून उपस्थितांनीही त्यांनी मनमुराद दाद दिली. या स्पर्धेत ४० ते ५० वर्षे वयोगटात अमित सिंग अव्वल आला तर ५० ते ६० वर्षे वयोगटात संजय माडगावकर सरस ठरले तर ६० वर्षावरील गटात प्रमोद जाधवने बाजी मारली. हे खेळाडू वयाने वयस्कर झाले असले तरी त्यांच्यात शरीरसौष्ठवाची आग कायम असल्याचे दिसून आले.
दिव्यांगानीही मनं जिंकली
ज्यूनियर मुंबई श्री आणि मास्टर्स स्पर्धेसोबतच दिव्यांगांचीही स्पर्धा पार पडली. केवळ एका गटात झालेल्या स्पर्धेत वर्ल्डवाईड जिमचा महबूब शेख पहिला आला. या दिव्यांगांची पीळदार देहयष्टी पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही शरीरसौष्ठवाची प्रेरणा मिळाली. या स्फूर्तीदायक स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा स्पर्धेचे आधारस्तंभ विक्रम रोठे, अमोल कीर्तीकर, सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांच्यासह जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, आयबीबीएफच्या अध्यक्षा हिरल सेठ, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर , सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे तसेच संतोष पवार, विजय झगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
ज्यू. मुंबई श्रीचा निकाल : ५५ किलो वजनी गट – १. यश महाडिक (जय भवानी), २. ओमकार भानसे (शिवाजी जिम), ३. सरफराज अन्सारी (ग्रीन फिटनेस), ४. रोहित थवी (अपूर्वा जिम), ५. दिग्गज रावत (सालेम जिम).
६० किलो – १. सुरज सिंग (शिवाजी फिटनेस), २. समीर सितप (स्ट्राँग फिटनेस), ३. वंश परमार (जय भवानी), ४. जतीन श्रीवास्तव (एसपी फिटनेस), ५. आदित्य सरमळकर (आर्मस्ट्राँग हब).
६५ किलो- १. हर्ष गुप्ता (भारत हेल्थ), २. राज सकपाळ (अनय प्युअर फिटनेस), ३. शुभम सकपाळ (लक्ष्मीनारायण), ४. समर्थ कोचले (सर्वेश फिटनेस), ५.संजय नाडर (जय भवानी),
७० किलो- १.रोशन पांडा (परब फिटनेस), २. सुरज यादव (शिवाजी जिम), ३. विग्नेश चव्हाण (बोईंग फिटनेस), ४. भोजराज मदाने (एनके फिटनेस).
७५ किलो- १. राज गोळे (जय भवानी), २. आदर्श राजेशिर्वेâ (गजानन केणी), ३. यश कानडे (परब फिटनेस), ३राहुल वेंगुर्लेकर (जुमानिया).
दिव्यांग मुंबई श्री – १. महबूब शेख (वर्ल्डवाईड), २. प्रथमेश भोसले ( माँसाहेब), ३. विकास सुगरकर (पोईसर जिमखाना), ४. मंदार मिर्लेकर (एज ५४).
मास्टर्स मुंबई श्री (४०ते५०वर्षे)- १. अमित सिंग (जेडीएस जिम), २. अरूण पाटील (सालेम जिम), ३. जगदीश कलमकर (मारुती जिम), ४. जयेश कदम (माँसाहेब जिम), ५. ऋषिकेश तेंडुलकर (शिवशक्ती जिम).
मास्टर्स ५० ते ६० वर्षे- १.संजय माडगावकर (आरएम भट), २. जीतेंद्र शर्मा (आई माऊली), ३. संतोष ठोंबरे (न्यू राष्ट्रीय), ४. ओनिल डिमेलो ( माँसाहेब), ५. दत्ताराम कदम (जय भवानी).
मास्टर्स ६० ते ७० वर्षे– १. प्रमोद जाधव (जिमको), २. प्रकाश कासले (जय हनुमान), ३. राजेंद्र शिरोडकर (इन्सेन फिटनेस), ४. अनिल जैतापकर (डायनामिक जिम), ५. विष्णू देशमुख (गजानन).
ज्यू. मेन्स स्पोर्टस् फिजीक (१६५ सेंमी) – शिकाप बेग (जय भवानी), २. मन्नन शाह ( ग्रीन फिटनेस), ३. स्वयम भोईर (प्रतीज्ञा जिम), ४. प्रशांत सावर्डेकर ( जय भवानी).
ज्यू. मेन्स स्पोर्टस् फिजीक (१६५ सेंमीवरील) – १. सोहेल इद्रिसी ( शाहुनगर), २. रेहान सय्यद (डीएन फिटनेस), ३.इमरान काझी (मॉडेल फिटनेस), ४. मीत चव्हाण (जय भवानी), ५. किरण कापसे ( फॉर यू)

 286 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.