मुंब्र्यात जुन्या बुद्धविहाराच्या आवरात नशेडीं समाजकंटकाचा वावर

अपप्रवृत्तींना विरोध केल्याने बुद्धविहारावर दगडफेक आणि जातीवाचक शिवीगाळ,तक्रारदारांनी गुंडांवर एक्ट्रोसिटीच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाणे : मुंब्रा परिसरातील सम्राट नगर परिसरात असलेल्या जुन्या बुद्धविहाराच्या आवारात नशेडींचा आणि दारू पिणाऱ्या अपप्रवृत्तीचा वावर वाढलेला आहे. या नशेडी आणि अपप्रवृत्तींना विरोध केल्यानंतर बुद्धविहारावर दगडफेक आणि जातीवाचक शिवीगाळी करण्यात येत असलायची लेखी तक्रारी रामा अंकुश हाटकर यांनी केल्या आहेत. मात्र समाजकंटकाची नवे तक्रारीत दिल्यानंतरही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तर या अपप्रवृत्तीवर एक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हयान्वये कारवाई करावी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना करण्यात आलेली आहे.
बौद्ध समाजाचे बुद्धविहाराची देखभाल करणारे रामा हाटकर ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बुद्धविहारावर दगडफेक करीत काचा तोडून बुद्ध मूर्तीची दगडफेक करून विटंबना करण्यात आली. हाटकर निवास इमारतीतील हुसेन मेहबूब शेख, बॉम्बे कॉलनी व (पत्नी) जोया हुसेन शेख , सूर्यकांत उर्फ आबा विनायक कदम, अक्षय मोरे, सुखदेव साळवी, रोहिदास दिघे यांचा या कृत्यात सहभागी असल्याचे तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. बुद्धविहार परिसरात वावर करण्यास विरोध केल्याने आम्हाला आणि कुटुंबाला जातिवाचक शिव्या देताना तुमच्या सारख्या महार, लोकांनी इथे राहू नका, आई बहिणींवरून घाणेरड्या शिवीगाळ करतात, दारू पिऊन रात्री अपरात्री येऊन वाद घालून मारहाण करतात. सदरचा त्रास २४ ऑक्टोबर २०२२ पासून हा त्रास सुरु आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना समाज देऊन सोडण्यात येते. त्यानंतर पुन्हा त्रास देण्यात येत आहे. आता पर्यंत पाच तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. त्रास देणारी मंडळी हि नशेडी असलयाने पोलिसही त्यांच्यवा रकारवाई करीत नाहीत. सादर प्रकरणी न्याय नाही मिळाला आप्पारावृतींवर कायदेशीर कारवाई न केल्यास पीडित दलित कुटुंब आमरण उपोषण करेल असा इशारा हि हाटकर यांनी पोलीस आयुक्ताना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

 8,104 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.