श्री माँ बालनिकेतन हायस्कूलमध्ये शालेय वार्षिक प्रदर्शन

प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले आहे.

ठाणे : श्री माँ बालनिकेतन हायस्कूल कोपरी, ठाणे (पूर्व) येथे विविध विषयांर्तगत प्रकल्पासह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी श्री माँ ट्रस्टचे विश्वस्त, श्री माँ ग्रुप ऑफ इस्टिट्यूशनच्या संस्थापिका श्री तारा माँ यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. हे प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी श्री माँ ट्रस्टचे विश्वस्त – चेअरमन व श्री माँ ग्रुफ ऑफ इनिस्टट्यूशनचे डायरेक्टर बालगोपाल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच रणजीत पाटील (रस्त्यावरिल सुरक्षा), डॉ. अंजना राठी (सकस आहार आरोग्यासाठी जीवनाचा मार्ग), एन आय ई टाईम्स (परकीय भाषा कशी काय केव्हा – कार्यशाळा), लता अय्यर (अपयशाची भिती), अजित कुलकर्णी (शारीरिक स्वास्थ्य – जीवनशैलीतील सुधारणा) आणि सचिन सूर्यवंशी (सायबर क्राईम समाजमाध्यम) या वक्त्यांची भाषणमाला आयोजित केली होती.
या कार्यक्रमाप्रसंगी सेक्रेटरी रमेश जोशी, प्रि. चित्रा अय्यर, प्रि. सेजल नारंग आदी मान्यवरांसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 52,084 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.