ठाणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर कारवाई कधी ?

आमदार संजय केळकर यांचा मनपा आयुक्तांना थेट सवाल

ठाणे : ठाणे शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याची तक्रार आमदार संजय केळकर यांनी मागील महिन्यात करून संबंधित अधिकारी आणि ठेकदारांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.त्यावर काय कारवाई केली ? याचा जाब शुक्रवारी आमदार संजय केळकर यांनी थेट आयुक्तांना भेटुन विचारला. एकीकडे मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई होते आणि ठाणे मनपात का नाही ? असा सवाल केल्यानंतर १० दिवसात अहवाल देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्याचे आमदार केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ठाणे शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधींची विकास कामे सुरु असुन अनेक कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आल्याचे पुराव्यानिशी १० जानेवारी रोजी आमदार संजय केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून केला होता. त्यात स्मार्ट सिटीतील अनेक कामांसह ठाणे पूर्व कोपरी येथे एक कोटी खर्चून जॉगिंग ट्रॅक बनवला. शहरातील पदपथांच्या कामात ठेकेदारांनी केलेली लूट आणि २६ तलावांच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी १८६ कोटींची तरतूद आदी संदर्भातील पुरावे आमदार केळकर यांनी आयुक्ताना सादर केले होते. याचा आढावा घेण्यासाठी आमदार केळकर यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेतली.सर्वप्रथम ठाणे रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्याबदूल आयुक्तांचे अभिनंदन करून फेरीवाला मुक्त परिसराची मर्यादा १५० मीटर ऐवजी पेक्षा २०० मीटर पर्यत करण्याची सूचना केली.तसेच, महापालिकेला विविध स्त्रोतातुन मिळणाऱ्या कोट्यवधीच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा.याबाबत पुरावे दिलेल्या प्रकरणांवर काय कारवाई केली. असा सवाल करून जर मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते तर ठाणे मनपात का नाही. करोडोंची लूटमार झालेली आहे. केवळ ठेकेदारांवर कारवाई न करता अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी.तेव्हा,येत्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी केलेल्या कारवाईची माहिती द्यावी.अशी मागणी केली. त्यावर आयुक्तानी १० दिवसात यावर कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.दरम्यान,ठाणे स्थानक परिसरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाना होणारा त्रास, रिक्षा चालकांची वाढती अरेरावी यावर तोडगा काढण्यासाठी रिक्षा संघटनांसोबत संयुक्त बैठक घेणार असल्याचे आ.केळकर यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांमुळे शहराला विद्रुपीकरणाचा बट्टा.
ठाणे शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांविषयी आमदार संजय केळकर यांना विचारले असता त्यांनी,अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाकडे वारंवार पेन ड्राइव्ह तसेच अन्य प्रकारे तक्रारी केल्याचे सांगितले. पूर्वीची बेकायदा बांधकामे बाजुलाच राहीली,आजही अशी बांधकामे सुरु आहेत. आपण शहर स्मार्ट करण्यासाठी रंगरंगोटी करत आहोत आणि हे भुमाफीया शहर विद्रुपीकरण करत आहेत.तेव्हा, नागरीकांनी प्रत्येक वेळी कोटाची पायरी चढावी का ? असा सवाल करून ठोस कारवाई करा अन्यथा, पुढील काळात विधिमंडळात तसेच लोकशाहीतील सर्व आयुधांचा सनदशीर मार्गाने वापर करण्याचा इशारा दिला.

 25,145 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.