पंचगंगा, लक्ष्मीमाता, भवानीमाता, जागृती यांची विजयी सलामी

श्री साई क्रीडा मंडळ पुरुष द्वितीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.

मुंबई : पंचगंगा, लक्ष्मीमाता कबड्डी संघ, भवानीमाता प्रतिष्ठान, जागृती मंडळ यांनी श्री साई क्रीडा मंडळ आयोजित द्वितीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. लोअर परेल, मफतलाल कंपाऊंड येथील कुमार गणेश गोताड क्रीडांगणावर आजपासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात पंचगंगाने खडा हनुमानाचे आव्हान ३२-११असे संपुष्टात आले. मध्यांतराला १७-०३अशी आघाडी घेणाऱ्या पंचगंगाने नंतर देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय मिळविला. रवींद्र साळुंखे, प्रतीक साळुंखे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. लक्ष्मीमाता कबड्डी संघाने ओम श्री साईनाथला ३२-१७ असे नमविले ते सौरभ तुणतुणे, कल्पेश सातमकर यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. साईनाथचा विघ्नेश टेमकर चमकला.
भवणीमाताने सुशांत धावडे, प्रशांत सावंत यांच्या अष्टपैलू खेळामुळे हिंदकेसरीवर ३२-२५ अशी मात केली. साहिल तळेकर, हर्षद पवार यांनी हिंद केसरी कडून कडवी लढत दिली. शेवटच्या सामन्यात जागृतीने विशाल नमसले, रोशन तळेकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर न्यू परशुराम बॉईजला ४३-२० असे पराभूत केले. न्यू परशुरामचा अनिरुद्ध गोणभरे बरा खेळला. या स्पर्धेचे उदघाटन शाखाप्रमुख दीपक बागवे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सिताराम साळुंखे, मंडळाचे संस्थापक किसन पवार, निरीक्षक संदीप काळगांवकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

 133 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.