आमदारांच्या भेटीत मुस्लिम बांधवांच्या समस्यांवर उतारे

राबोडीत आमदार आपल्या भेटीला कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

ठाणे : विविध प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच राबोडी परिसराला भेट दिली. त्यावेळी मुस्लीम बांधवांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या. यावर केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यावर तोडगा काढला.
वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे चुकीची बिले आली आहेत, महावितरणचा मनमानी कारभार सुरु असून अरेरावी करून वीज बिल भरण्यास धमकावले जात आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार केळकर यांनी तत्काळ अधिक्षक अभियंता अरविंद बुलबुले यांना फोन करून, महावितरण संदर्भातील तक्रारी व समस्या संदर्भात तातडीने शिबिर लावून विविध तक्रारींचे निराकरण करण्याची केली.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लावलेले पाणी मीटर संदर्भात तसेच कर आकारणीच्या बिलावर नमुद केलेल्या ‘स्लम’ उल्लेखाविषयी नागरीकांच्या तक्रारी आल्याने त्यावर पालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांची आमदारांसमवेत संयुक्त बैठक बोलावून यासंदर्भातील शंकाचे निरसन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
राबोडीतील पुर्नविकास संदर्भातील अडचणी तसेच विकासकामार्फत केली जाणारी फसवणुक या तक्रारींवर ठाणे मनपाच्या आयुक्तांशी आणि संबधित अधिकाऱ्यांशी बोलुन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार केळकर यांनी नागरीकांना दिले.
फरहान सिद्दीकी यांनी हा कार्यक्रम राबण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी योगेश भोईर, विक्रम भोईर, दिलीप कंकाळे, प्रवीण रानडे, अश्रफ नायकवाडी, मुख्तार शेख, तौफीक मेहबूब शेख, वासिम कुरेशी, अरिफ सय्यद आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

 766 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.