छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील कॅटरिंग कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण


बदलत्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक- तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर

ठाणे / नवी मुंबई : अल्प व मध्यमवयीन नागरिक सुध्दा या अकस्मात हृदयरोगाला बळी पडत आहेत. हृदयाचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते तेव्हा अशा प्रकारचे कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन सीपीआर ची माहिती व प्रशिक्षण असेल तर काही मिनिटाच्या सुवर्णकाळात आपण त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो अपघात असो वा  हृदयविकाराचा आघात अथवा ब्रेन स्ट्रोक  प्रसंगात अनेकदा गोल्डन अवर उपल्बध असताना रुग्णाचा जीव वाचविता येत नाही. मुळात अशा वेळी काय करावे, हे देखील अनेकांना माहित नसते.नेमकी हीच गरज लक्षात घेऊन नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग व  टूरीझम कॉर्पोरेशन च्या कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ७२ कर्मचारी उपस्थित होते. हृदयविकार अथवा अपघाताच्या ठिकाणी एखाद्याची हृदयक्रिया मंद झाल्यानंतर गोल्डन अवरमध्ये उपचार मिळायला हवेत. तुमच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यावर प्रत्येक सेकंदाची गणना होते. कार्डियाक अरेस्ट कधीही आणि कुठेही होऊ शकतो. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट समस्या असू शकते. अशा स्थितीत अनेक वेळा रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते आणि उपचार सुरू होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर देणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला  हे सीपीआर प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे अशी माहिती तेरणा हॉस्पिटलच्या भूलतज्ज्ञ ( एमडी )  डॉ. आसावरी यांनी दिली. या प्रशिक्षणामध्ये रबरी मानवी पुतळ्याच्या मदतीने  अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पिडीतांना वैद्यकियदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्य वेळी सीपीआर (कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयावर दाब देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर तेरणा हॉस्पिटलचे डॉ. अजित निळे यांच्या मार्गदशनाखाली कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली या आरोग्य तपासणीत हृदय तपासणी ( इसीजी), बीएमआय , मधुमेह,  उच्च  रक्तदाब व डॉक्टरांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्डियाक अरेस्ट, गुदमरणे, बुडणे, इलेक्ट्रिक शॉक मुळे श्वासोच्छवास इत्यादीसारख्या अनेक आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर मोठी भूमिका बजावतो याच सामाजिक जाणिवेतून यावर्षी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर ५००० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची  माहिती हॉस्पिटलच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

 2,738 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.