प्रशांत – आकांक्षाला अग्र मानांकन

उत्सव मित्र मंडळ, खंडाळा यांच्यावतीने व मछिंद्र खराडे यांच्या पुढाकाराने लोणावळा येथे रंगणाऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात २०० तर महिला एकेरी गटात ३६ खेळाडूंनी भाग घेतला असून २७ जानेवारी रोजी सकाळी ठिक १० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होईल.

लोणावळा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव मित्र मंडळ, खंडाळा यांच्यावतीने व मछिंद्र खराडे यांच्या पुढाकाराने कुमार रिसॉर्ट, लोणावळा येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुरुष एकेरी गटात २०० तर महिला एकेरी गटात ३६ खेळाडूंनी भाग घेतला असून २७ जानेवारी रोजी सकाळी ठिक १० वाजता पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यु ट्युब चॅनेलवरून या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकने पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ), २ ) झैदी फारुकी ( ठाणे ), ३) पंकज पवार ( मुंबई ), ४) महंम्मद घुफ्रान ( मुंबई ), ५) सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ), ६) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ), ७) योगेश धोंगडे ( मुंबई ), ८) गिरीश तांबे ( मुंबई )
महिला एकेरी : १) आकांक्षा कदम ( रत्नागिरी), २) निलम घोडके ( मुंबई ), ३) प्राजक्ता नारायणकार ( मुंबई उपनगर ), ४) मिताली पाठक ( मुंबई ), ५) काजल कुमारी ( मुंबई), ६) संगीता चांदोरकर ( मुंबई ), ७) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), चैताली सुवारे ( ठाणे)

 406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.