कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ स्नेहसंमेलन मेळाव्यात कबड्डीचा थरार

कोयना क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने समाजाची बांधिलकी म्हणून दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात.

ठाणे : कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने यावर्षी म्हाळुंगे या गावी क्रीडा महोत्सव तसेच कोयना क्षत्रिय समाजाचा स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन. २८ आणि २९ जानेवारी रोजी करण्यात आले असून कार्यक्रम प्रसंगी कबड्डीचा थरार प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.
कोयना क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने समाजाची बांधिलकी म्हणून दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. यामुळे यावर्षी स्न्हेसंमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कर्तृत्ववान ज्येष्ठांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदक सन्मानित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे यांचा विशेष सन्मान आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दुर्गम भागात केलेल्या कार्यामुळे यशवंत मोरे यांचा शिक्षण महर्षी सन्मान देऊन गौरव या प्रसंगी होणार आहे.
शनिवार २८ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते होणार आहे .  गुणगौरव समारंभाला आमदार बालाजी किणीकर, माजी महापौर संजय मोरे, माजी विरोधी पक्ष नेता मनोज शिंदे, माजी नगरसेविका सर्वश्री वर्षा मोरे, संध्या मोरे, संजना कदम, रामवरदायनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष दिलीप कदम, कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर, साळुंखे परिवार सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन शिंदे, दसपटी क्रीडा मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण शिंदे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, विश्वास मोरे, प्रताप शेट्टी सरचिटणीस मुंबई उपनगर कबड्डी संघटना, दशरथ शिंदे, अरुण म्हात्रे आदी राष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार असून राष्ट्रीय खेळाडू अर्जुनराव कदम क्रीडा नगरीतील म्हाळुंगे गावात कोयना क्षत्रिय मराठा समाज स्तरीय कबड्डीचा थरार नागरिकांना पहावयास मिळणार असल्याचे कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय मोरे, सरचिटणीस  सुरेश साळवी यांनी सांगितले. या स्नेहसंमेलनात महिलांचा हळदी – कुंकू समारंभ देखील होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक ग्राम विकास मंडळ म्हाळुंगे आणि ग्रामस्थ मंडळ म्हाळुंगे असणार आहे यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली असे आवाहन कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 7,710 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.