ऍग्रीबीड क्रिकेट क्लबचा विजय

ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने दिलेल्या ९ बाद १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जे व्ही स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ७ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.

मुंबई : ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा २६ धावांनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने दिलेल्या ९ बाद १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जे व्ही स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ७ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
सामन्यात प्रतीक घरत (३९), अख्तर शेख (३०), अमन मणियार (२५) आणि अजय यादवच्या २३ धावांमुळे ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने दिड शतकी धावसंख्येचा पल्ला पार केला. शाश्वत पाठकने चार फलंदाज बाद केला. शशांक जाधवने दोन, बादल शेख आणि विशाल पाष्टेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल गोलंदाजीप्रमाणे फ्लदाजीतही छाप पाडताना शाश्वत पाठकने दमदार फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण इतर फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याने जे व्ही स्पोर्ट्स क्लबला सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. सिद्धेश जाधवने १५ आणि मिथिलेश यादवने १४ धावा केल्या. आलम शेखने दोन, विरेंद्र यादव, अख्तर शेख आणि अमन मणियारने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक – ऍग्रीबीड क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १६९ ( प्रतिक घरत ३९, अख्तर शेख ३०,अमन मणियार २५, अजय यादव २३, शाश्वत पाठक ३-३०-४, शशांक जाधव ४-२२-२, बादल शेख ४-३६-१, विशाल पाष्टे २-१०-१) विजयी विरुद्ध जे व्ही स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ७ बाद १४३ (शाश्वत पाठक ६५, सिद्धेश जाधव १५, मिथिलेश यादव १४, आलम शेख ४-३३-२, अख्तर शेख ४-१-१८-१, विरेंद्र यादव ४-१९-१, अमन मणियार ४-३२-१). ऍग्रीबीड क्रिकेट क्लब २६ धावांनी विजयी. सामनावीर – अख्तर शेख.

 131 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.