स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी हाच हिंदूंना पर्याय

कोनगाव (भिवंडी) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वाचा हुंकार

कल्याण : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याण आणि भिवंडीत हिंदूंच्या भूमीवर मोठ्या प्रमाणात अन्य पंथीयांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद तसेच गड किल्ले यांच्यावरील अतिक्रमण यांमुळे सर्वसामान्य हिंदू त्रस्त झाला आहे. आज हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी हाच एक पर्याय असून हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे असे आवाहन  हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद वडके यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कल्याण पासून जवळच असलेल्या भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी सुद्धा उपस्थितांना संबोधित केले. या सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, समाजातील विविध मान्यवर यांच्यासह शेकडो धर्मप्रेमी उपस्थित होते. आपले पद, पक्ष, संघटना, संप्रदाय हे सर्व बाजूला ठेवून कल्याण आणि भिवंडी नगरी हिंदुराष्ट्र नगरी करण्याचा निर्धार कोनगाव येथील ग्रामस्थांनी यावेळी केला.
   या सभेचा प्रारंभ शंखनाद झाल्यावर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. त्यानंतर वेदमंत्रपठण करण्यात आले. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक अनुराधा वाडेकर आणि सनातन संस्थेच्या संत संगीता जाधव यांची  उपस्थिती लाभली. उपस्थित संत, वक्ते आणि मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे  सुनील कदम यांनी सांगितले.
*धर्मशास्त्र समजून धर्माचरण केल्यास हिंदू राष्ट्राची पहाट उजाडायला वेळ लागणार नाही ! – धनश्री केळशीकर, सनातन संस्था*
    ‘आपल्या देशात शासकीय अनुदानातून मदरसांमधून इस्लामचे शिक्षण, तर कॉन्व्हेंट शाळांमधून बायबल शिकवले जाते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांमधून हिंदु धर्म शिकवण्यासाठी सरकारी अनुदान नाही. ही संविधानातील असमानता दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे’. हिंदु राष्ट्राला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी साधना आणि सुसंस्कार अत्यंत आवश्यक आहेत. यासाठी प्रत्येक हिंदूनी धर्मशास्त्र समजावून घेऊन धर्माचरण करायला प्राधान्य दिले, तर हिंदू राष्ट्राची पहाट उजाडायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी केले.

 3,691 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.