अधिकाऱ्यांच्या चुकीच्या भुमिकेतून नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे अखेर आमदार प्रताप सरनाईक यांना करावे लागले आंदोलन
ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पोखरण रोड नं. १ समतानगर येथील चौकासमोरील वळण रस्ता वाहतुक विभागाच्या प्रशासकिय अधिकार्यांच्या माध्यमातून बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला होता. आज ७ जानेवारी रोजी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाश्यांनी आंदोलन करून सदरहू वळण रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटविण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना रहदारीचा त्रास होऊ नये याकरिता पोखरण रोड नं. १ हा रस्ता तात्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्याकाळात रूंदीकरण करण्यात आला होता. सदरहू रस्ता बनविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:ची मालकी हक्क असलेली घरे दिलेली असून ठाणे शहरातील सर्वात जास्त रूंदीकरणाचा रस्ता म्हणून ओळखण्यात येतो.
मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अड़थळा होत असल्यामुळे पोलिस वाहतुक विभागाच्या अधिकार्यांनी समतानगर चौकासमोरील वळण रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला. जर रहदारीचा प्रश्न उद्भवत असेल तर वाहतुक विभागाच्या अधिकार्यांनी रेमंड कंपनी समोरील जाणारा रस्ता सोडला, सिंघानिया शाळेला जाणारा सोडला पण समतानगर चौकासमोरील वळण रस्त्यावरून लाखों लोकांची वर्दळ होत असून समतानगर मधील स्थानिक नागरिकांचा त्यासाठी विरोध असताना देखील ’सदरहू वळण रस्ता का बंद करण्यात आला?“ असा आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनास जाब विचारण्यात आला.
समतानगरमधील १८ मीटर रस्ता पुढे लुईसवाडीला जावून मिळतो त्यामुळे तेथे वाहतुक वर्दळ जास्त असते. बाजूला असलेल्या रेमंड कंपनी व सिंघानिया शाळेला झुकते माप देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी व वाहतुक पोलिस यांच्या संगनमताने स्थानिक नागरिक व माजी नगरसेवक यांना विश्वासात न घेता असा तुघलघी निर्णय घेण्यात आला. “स्थानिक नागरिकांकरिता मला रस्तावर उतरून आंदोलन करावे लागले तरी त्याकरिता माझी तयारी आहे” असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून राज्य शासनाकडून तांत्रीक अड़चणीमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. त्यामुळे सद्या महापालिकांवर प्रशासकिय राजवट असून महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या अभावामुळे महापालिकेच्या अधिकार्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक आमदार म्हणून काळे कपडे घालून प्रशासनाच्या या वृत्तीचा मी निषेध करीत आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
यावेळी महापालिकेचे अधिकारी ढोले यांना बोलावून समातनगर चौकासमोरील डिव्हाडर मधील रस्ता तात्काळ पुर्ववत करून तेथे सिग्नल यंत्रणा बसविण्यासंदर्भात संबंधित विभागास आमदार प्रताप सरनाईक यांनी सुचना दिल्या.
या आंदोलनामध्ये विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपविभागप्रमुख संतोष ढमाले, संदिप डोंगरे, भगवान देवकते, चंद्रशेखर एंगडे, महेश लोखंडे, नंदकुमार पिसाळ, राकेश यादव, सुनिल शिंदे, बाळू जाधव, राकेश शिंदे, किरण भुजबळ, महेश शिंदे, विराज निकम, सुशांत मयेकर, देवेंद्र साळवी, विनय बांबर्डेकर, निलेश चव्हाण, तसेच बाळासाहेबांची शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.
13,967 total views, 1 views today