सचिन शिंदे, राहुल पिंगळे ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी

विविध विषयांतील अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे पदाधिकारी म्हणून सचिन शिंदे व राहुल पिंगळे ओळखले जातात.

ठाणे : ठाणे जिल्हा इंटक चे अध्यक्ष सचिन शिंदे,ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे व ऍड बाळासाहेब भुजबळ यांची ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नियुक्ती केलेली आहे. विविध विषयांतील अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे पदाधिकारी म्हणून सचिन शिंदे व राहुल पिंगळे ओळखले जातात सचिन शिंदे पूर्वी पासूनच काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडत आहेत.हे दोघे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी असून वेळोवेळी माध्यमांमध्ये पक्षाची बाजू समर्थपणे मांडत चर्चेमध्ये सहभागी होत असतात तसेच बाळासाहेब भुजबळ हे पेशाने वकील असून कायदे विषयक त्यांचा चांगला अभ्यास असून गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत,त्यांच्या कार्याला अधिक वाव मिळावा तसेच पक्षाची बाजू अधिक सक्षमतेने मांडता यावी या हेतूने त्यांना ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्त केल्याचे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे.काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे विचार तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करणार असल्याचे सचिन शिंदे व राहुल पिंगळे यांनी सांगितले.

 27,975 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.