रोटरी क्लबतर्फे गाण्यांची स्पर्धा

ठाणे शहरापुरता मर्यादित असणाऱ्या या स्पर्धेत १५ ते ३० वर्षं वयोगट आणि खुला गट असे दोन गट असतील.

ठाणे :रोटरी क्लब ऑफ ठाणे अँजेल्स तर्फे ठाणेकरांसाठी गाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १४ जानेवारी रोजी सहयोग मंदिराच्या सभागृहात ही स्पर्धा रंगेल. केवळ ठाणे शहरापुरता मर्यादित असणाऱ्या या स्पर्धेत १५ ते ३० वर्षं वयोगट आणि खुला गट असे दोन गट असतील. सहभागी स्पर्धकांना गाण्यासाठी ३ मिनिटांचा अवधी दिला असून त्यात त्याने भक्तीगीत, भावगीत, गझल किंवा नाट्यसंगीत सादर करायचे आहे. प्रत्येक गटात पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका ११ जानेवारीपर्यंत स्विकारल्या जातील. प्रवेशिका आणि स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९००४४९७०९१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 77,452 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.