लाईट बिलातील वीज वहन आकार नियमबाह्य

लाईट बिलातील वीज वहन आकार नियमबाह्य

आगामी अधिवेशनात आवाज उठवणार – आमदार संजय केळकर

ठाणे : वीज बिलातील वहन आकार नियमबाह्य असून या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवून नागरिकांना न्याय द्यायचं काम करणार असे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी टोरंट ऑफिस कळवा येथे आज झालेल्या मीटिंगमध्ये सांगितले वीज देयकासह प्रत्येक ग्राहकाकडून वहन आकार वसूल केला जातो हा आकार नियमबाह्य असल्याचा दावा मंदार भट यांनी सांगितले. वीज वितरण कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकाकडून वीज वहनआकार वसूल करतात. राज्य सरकारी महावितरण कंपनी नोव्हेंबर २०१६ पासून ही वसुली करीत आहे ही वसुली नियमबाह्य असल्याने ती एक प्रकारे लूट आहे या लुटीचा आकडा जवळपास ७० ते ८० हजार कोटी रुपये असल्याचा दावा मंदार भट यांनी केला आहे. आणि या संदर्भात ते न्यायालयीन लढा लढत आहेत. वहन आकार नियमबाह्य आहे वीज कायदा व त्यामधील सुधारणा नुसार हा वहन आकार केवल ओपन एक्सेस अर्थात एक मेगा व्हॉटहुन अधिक थेट वीज खरेदी करणाऱ्या कडूनच वसूल करता येतो. पण राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्या हा आकार सर्वच ग्राहकाकडून वसूल करीत आहेत मुख्य म्हणजे ही वसुली फक्त महाराष्ट्रातच सुरू आहे महाराष्ट्रात शिंदे फडवणीस सरकार आहे आणि हे सरकार लोकहिताचे निर्णय घेणारा सरकार आहे त्यामुळे लोकांच्या हिताचा निर्णय हे सरकार घेईल आणि या संदर्भात आपण ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची शिष्टमंडल घेऊन भेट घेऊन त्यांना या संदर्भातली माहिती देऊ असे संजय केळकर यांनी म्हटले आहे यावेळी त्यांच्याबरोबर मंदार भट, ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे, दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, कळवा मंडळ अध्यक्ष हिरोज कपोते, नरेश पवार, मुंब्रा मंडळ अध्यक्ष कुणाल पाटील, कौसा मंडळ अध्यक्ष सोहिल शेख, शीळ मंडळ अध्यक्ष साहिल पाटील, दिवा वार्ड अध्यक्ष नागेश पवार, कुणाल निंबाळकर, कन्हयालाल विश्वकर्मा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 520 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.