श्री चैतन्य टेक्नो शाळेचा आणखी एक यशस्वी विश्वविक्रम

उल्हासनगरमधील श्री चैतन्य शाळेतील १२ विद्यार्थ्यांचा समावेश.

उल्हासनगर : श्री चैतन्य टेक्नो शाळा, ज्याने आधीच दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि आज ५ जानेवारी रोजी आणखी एक विश्वविक्रम यशस्वीपणे प्रस्थापित केला. या विक्रमामध्ये १० राज्यांतील श्री चैतन्य टेक्नो शाळांच्या पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील १००० मुले केवळ १०० दिवसांच्या प्रशिक्षणात १०० मिनिटांत १०० गणित टेबल पाठ त्यांना लाईव्ह एकाच वेळेस संपूर्ण भारतामध्ये टेबल बोलण्याची संधी दिली असे मुंबई विभाग श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे जनरल मॅनेजर सुरेंद्र यांनी सांगितले. तसेच उपक्रमांमध्ये मुंबईमधील उल्हासनगर शाखेतील श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या आर्या नायर,अनिश चुघ, अंश दुबे, शिवांश पांडे, विश्वेश एम , समीरण फुकान, हिरेन वळेचा, दर्शना होळकर , सिद्धांत पाटील, सिमरन लोखंडे, मयंक सिंग, मैत्री पटेल आदी १२ विद्यार्थ्यांचा समावेश होता असे शाळेच्या मुख्याध्यापिका सीता पिंनामांनेनी यांनी सांगितलं. तसेच मुलांना प्रेरित करण्यासाठी मेघा तांदळे, प्रांजली वराडे , सुप्रीता गौडा देखील हातभार आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनद्वारे त्याचे निरीक्षण, चाचणी आणि रेकॉर्डिंग केले जाईल. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर, द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन, एक प्रमाणपत्र जारी करेल. यावेळी बोलताना श्री चैतन्य शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की श्री चैतन्य शाळा नेहमीच पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक मधील मुलांमध्ये लपलेले, अंगभूत कौशल्ये बाहेर आणून उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया रचत आहेत. कमाल पातळीपर्यंत, त्यांच्या मेंदूला प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण देणे, दबावाशिवाय लहानपणापासूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हेच आमचे उद्देश्य आहे.
आज हे साध्य करण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांनी खूप श्रम घेतले.

 3,557 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.