समाजाच्या जात प्रमाणपत्र, वारसा नोकरी हक्कांबाबत आमदार केळकर यांनी विधानसभेत उठवला होता आवाज.
ठाणे : वाल्मिकी मेहतर समाज समन्वय समितीच्या शिष्ठमंडळाने आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांचे संपूर्ण वाल्मिकी समाज ठाणे तर्फे आभार मानले. सफाई कामगार वारस हक्क नोकरी संदर्भात जातीचे प्रमाणपत्र व कामगारांच्या इतर महत्वांच्या विविध विषयांबाबत आमदार केळकर यांनी नागपूर विधिमंडळ आबाज उठवल्याबद्दल, सभागृहात त्या मांडल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी संयोजक समितीचे जगदीश खैरालिया, धर्मवीर मेहरोल, बिरपाल भाल, नरेश भगवाने, बिरसिंह पारछा, सतपाल मेहरोल, नंदकिशोर सौदे, नरेश बोहीत, विनोद कजानिया, नरेश, ऋषि सौदे, राजकुमार चटोले, अशोक परमार आदि कार्यकर्ता उपस्थित होते.
2,987 total views, 2 views today