मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार जाहीर

रामहरी कराड यांना ‘बाळशास्त्री जांभेकर’ स्मृती पुरस्कार, सुहास बिराडे यांना ‘ यशवंत पाध्ये’ स्मृती पुरस्कार तर डॉ सुकृत खांडेकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’.

मुंबई : मराठी वृतपत्र लेख संघ, महाराष्ट्र राज्य मुंबई या संस्थेचा २२ वा वर्धापन दिन सोहळा व पत्रकार दिन ६ जानेवारी चे औचित्य साधत या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी पुरस्कार घोषित केले.
पत्रकार क्षेत्रातील अती महत्वाचा समजला जाणारा ‘बाळशास्त्री जांभेकर’ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रामहरी तुळशीराम कराड (दै. नांदेड एकजूट, प्रतिनिधी, पुणे) यांना तर यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुहास बिराडे (दै. लोकसत्ता, वसई – विरार, मुंबई ) तर जीवन गौरव पुरस्कार डॉ. सुकृत खांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय गंगाधर म्हात्रे यांना आदिवासी सेवक पुरस्कार देण्यात येईल.
हा पुरस्कार प्रदान सोहळा ६ जानेवारी रोजी दादर येथे संपन्न होणार आहे.
पत्रकार भूषण पुरस्कारासाठी
अरुण सुरडकर (संपादक दै. सामपत्र, औरंगाबाद) ,भारत शंकरराव गठ्ठेवार (सहसंपादक दै. नांदेड एकजूट, नांदेड), दिलीप जाधव (प्रतिनिधी दै. रत्नागिरी टाईप्स),दिपक सोनवणे (संपादक दै. नवनगर, नवी मुंबई),
उद्योगश्री पुरस्कारासाठी शुभम गुप्ता (मुंबई), समाज भूषण पुरस्कारासाठी सुनिल साहेबराव टिप्परसे, नांदेड, सुमंगल मोहिते, मुंबई, सुहास मधुकर पाटील, सांगली, सचिन खुपसे ठाणे, राजू केशवराव, पालघर,
शिक्षक रत्न पुरस्कारासाठी वैशाली बेलाशे, मुंबई
पत्रभूषण पुरस्कारासाठी कृष्णा काजरोळकर, मुंबई, विश्वनाथ पंडीत, मुंबई, रमेश लांजेवार, मुंबई, श्याम ठाणेदार, ठाणे संजय साळगावकर,मुंबई यांची निवड करण्यात आली आहे.
दिवाळी अंकांचा पुरस्कार
सावी दिवाळी अंक, पालघर
दैनिक किल्ले रायगड, रायगड
गंधाली, मुंबई, अधारेखित, पालघर शब्द संवाद, रायगड यांना देण्यात येईल.
या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. लेखक, साहित्यिक , प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर असून प्रमुख अतिथी आमदार संजय केळकर, माहिती व जनसंपर्क महासंचानालयाचे संचालक हेमराज बागूल, माजी नगरपाल.डॉ.जगनाथ हेगडे यांची उपस्थिती लाभणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी केले आहे.

 171 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.