कोयना पुनर्वसीत उचाट गावाच्या उपसरपंच पदी आशिष मोरेंची निवड

ग्रामस्थांनी बहुमताने ठराव करून ग्रामविकास आघाडी उचाट या पॅनेलच्या आशिष मोरे यांच्यावर दाखवला विश्वास

ठाणे / वाडा : वाडा तालुक्यातील कोयना पुनर्वसन उचाट येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंच पदी मानसी घोरकने यांची निवड झाल्यानंतर उपसरपंच पदी आशिष मोरे यांची सर्वानुमते ठराव करून निवड करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील उचाट या गावी मागील दहा वर्षापासून प्रशासकीय राजवट होती. यामुळे निवडणूक होऊन प्रशासकीय कारकीर्द आता समाप्त झाली. यामुळे उचाट या गावी ग्रामस्थांच्या बहुमताने ठराव करून ग्रामविकास आघाडी उचाट या पॅनेलचे आशिष मोरे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असून गावचा विकास हेच प्रथम कर्तव्य असे उपसरपंच आशिष मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ग्रामविकास आघाडी उचाट पॅनल विजयी झाल्याने या पॅनलमध्ये सरपंच मानसी घोरकने, उपसरपंच आशिष मोरे, सदस्य स्वाती मोरे, सदस्य महेंद्र घोरकने, संदीप पारधी अशी ग्रामविकास आघाडी उचाट ग्रामपंचायतीचा पॅनल कार्यरत असणार आहे.

 20,285 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.