मुंबई इंडियन्स ज्युनिअर क्रिकेट स्पर्धा
ठाणे : मुंबईतील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या १६ वर्षांखालील मुंबई इंडियन्स ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत आज बुधवारी ठाण्याच्या श्री माँ विद्यालयाने विरारच्या सेंट झेवीयर्स हायस्कूल संघावर ९ गडी राखून एकहाती विजय मिळविला. आपल्या फिरकीच्या जादूवर ४ गडी बाद करणारा श्री माँ विद्यालयाचा गोलंदाज आदित्य कौलगी सामनावीर ठरला.
४० षटकांच्या या स्पर्धेत सेंट झेवीयर्स हायस्कूलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मध्यमगती गोलंदाज अथर्व सुर्वे याने आपल्या तिसऱ्या षटकात सलामीचा फलंदाज आदित्य वंजारा याला त्रिफळाचित केले. त्यानंतर रुद्र चाटभर याने दोन फटकात दोन फलंदाज बाद केले. मात्र त्यानंतर फिरकी गोलंदाज आदित्य कौलगी याच्या फिरकीपुढे सेंट झेवीयर्स हायस्कूलच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आदित्य कौलगीने पहिल्याच षटकात दोन फलंदाज बाद केले. आदित्यने ३ षटके टाकत २० धावांच्या मोबदल्यात ४ गडी टिपले. तर अभिनंदन चव्हाण याने १ फलंदाज बाद केला. सेंट झेवीयर्स हायस्कूलच्या संघाने २२.२ षटकांत सर्व बाद १०२ धावा केल्या. काव्या शहा याने सर्वाधिक ३१ धावा केल्या.
१०२ धावांचा पाठलाग करतांना श्री माँ विद्यालयाने १६.५ षटकांत ९ गडी राखून विजय संपादन केला. कामेश जाधव (३३धावा) आणि कर्णधार अभिनंदन चव्हाण (३८ धावा) या जोडीने नाबाद धावा करत संघाला सोपा विजय मिळवून दिला. रुजुल रांजणे याने १४ धावा केल्या. आदित्य कौलगीला सामनावीरचा खिताब मिळाला
22,437 total views, 1 views today