महाराष्ट्राच्या कुमारांचा बाद फेरीत प्रवेश तर मुलींची उपउपांत्य फेरीत धडक

४१ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा.

बन्सबेरिया (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सुरु असलेल्या ४१ व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र कुमार संघाने बाद फेरीत प्रवेश केला तर मुलींनी उपउपात्य फेरी गाठली.
बन्सीबेरी येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरु आहेत. कुमारांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने झारखंडचा २०-९ असा एक डाव ११ गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्र संघातर्फे सुरज झोरे ने (२.१०, २.२० मिनिटे संरक्षण व १ गुण ), गणेश बोरकरने (२.१०, २.२० मिनिटे संरक्षण व २ गुण ), निखिल (२.४० मिनिटे संरक्षण ), विवेक ब्राम्हणे (४ गुण ) यांनी चांगला खेळ केला. झारखंड तर्फे हर्ष (१.२० मिनिटे संरक्षण ), निखिल (१ मि. व २ गुण) यांनी खेळ केला. तर दुसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने मणिपूरचा २१-५ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवत अ गटात अव्वल स्थान पटाकावत बाद फेरीत प्रवेश मिळवला.
मुलींच्या उप उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने हरियाणाचा ११-१३ असा एक डाव ८ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदेने (४ मि. संरक्षण ), प्रीती काळे (२.४० मि. संरक्षण ), संपदा मोरे (२ मि. संरक्षण व २ गुण), वृषाली भोये (३ गुण) व कल्याणी काळे (३ गुण ) यांनी विजयात महत्वाची कामगिरी केली. हरियाणा तर्फे सीमालीने (१ मि. संरक्षण ) चांगला खेळ केला.
तत्पूर्वी मुली गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्र ने झारखंडचा १८-६ असा एक डाव १२ गुणांनी धुव्वा उडवत अ गटात अव्वल स्थान पटकवत बाद फेरी गाठली. यात प्रणाली काळे (३.३० मि. संरक्षण ), सानिका चाफे ( २.१० मि. संरक्षण ), दीपाली राठोड (४ गुण ), पायल पवार (१.१० मिनिटे ) यांनी चांगला खेळ केला.
मुलीमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या साखळी सामन्यात प. बंगालने दिल्लीचा ११-९ असा २ गुणांनी पराभव केला. यात विजयी प. बंगाल संघातर्फे प्रीती (२.५० मि. संरक्षण व ५ गुण ), मलिका (२ व २.३० मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला. तर दिल्ली तर्फे काजल (३.२०, १.१० मि. संरक्षण व २ गुण ), अंशु (१.५० मिनिटे संरक्षण व १ गुण ) यांनी खेळ केला.

 172 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.