सहाय्यक कामगार आयुक्तांचे ठामपा प्रशासनाला आदेश
ठाणे : मल उदंचन केंद्रातील कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांनी ठामपा प्रशासनाला आदेश एका पत्राद्वारे दिले आहे.
मे. ए. के. इलेक्ट्रीकल एण्ड वर्क्स या ठेकेदारानी मल उदंचन केंद्रातील कर्मचाऱ्यांना अद्यापही वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे बोनस अदा केलेले नाही. श्रमिक जनता संघाने थकित बोनस साठी ठाणे कामगार उप आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. वारंवार होणाऱ्या सुनावणीत ठाणे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित रहात नसल्याने बोनस प्रदान अधिनियम १९६५ अंतर्गत कारवाई करण्याची. नोटीस ठेकेदार व महापालिका प्रशासनाला सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी दिली आहे.
कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते आणि सोयीसुविधा ही ठेकेदार मे. ए. के. इलेक्ट्रीकल एण्ड वर्क्स अदा करत नसल्याने ठाणे औद्योगिक न्यायालयात ही केसेस सुरू असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगून यांत्रिकी विभागाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
मल उदंचन केंद्र आणि मलनिस्सारण विभागाचे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठामपा आयुक्त संतोष बांगर यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व संबंधित अधिकार्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ही खैरालिया यांनी केली आहे.
13,657 total views, 1 views today