जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेऊन यशाचे शिखर सर करा – क्रिकेटपटू प्रवीण तांबे

श्री माँ गुरुकुल शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या मैदानात संपन्न होत आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रवीण तांबे उपस्थित होते.

ठाणे : जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत आणि टीमवर्क करुन यशाचे शिखर खेळाडूंनी गाठावे. संघाच्या यशाबरोबर तुमचाही नावलौकीक वाढेल, असे मार्गदर्शन क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांनी केले. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथील श्री माँ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत प्रवीण तांबे बोलत होते.
श्री माँ गुरुकुल शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या मैदानात संपन्न होत आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बुधवार,२१ डिसेंबर रोजी प्रवीण तांबे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर प्रिन्सीपॉल चित्रा अय्यर (श्री माँ विद्यालय), प्रिन्सीपॉल सेजल नारंग (श्री  माँ बालनिकेतन), संस्थेचे सचिव जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.  
प्रवीण तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या खडतर क्रीडा क्षेत्राचा प्रवास कसा सुकर करावा याचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, श्री माँ विद्यालयाचे आपल्याला प्रशस्त मैदान लाभले आहे. शाळेचे संचालक मंडळ, प्रिन्सीपॉल, शिक्षक हे क्रीडा क्षेत्राला पोषक वातारण निर्माण करत आहेत. याचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्या. आजवरची शाळेची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. खेळ म्हटले की हारणे किंवा जिंकणे आलेच. पण हरलो म्हणून निराश होऊ नका पराभव पचवून पुढे जात रहा असा मोलाचा सलल त्यांनी दिला. खेळाला वयाचे बंधन नसते. वाढते वयाचे काऊंटींग न करता स्वप्न पहात रहा, एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी खेळाडू व्हाल, असेही ते  म्हणाले. यावेळी उपस्थित क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुला- मुलींना मोलाच्या टीप्स दिल्या.  
यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवात विजयी झालेल्या खेळाडूंचा प्रवीण तांबे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला

 12,402 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.