पुरुषांच्या ब गटात, तर महिलांच्या अ व ब गटातून बाद फेरी गाठण्याकरिता चुरस

७०वी पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-अहमदनगर- २०२२, पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर. स्पर्धा पहिल्यांदाच सहा मॅटच्या क्रीडांगणावर होणार.

मुंबई: महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत “७०व्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी भिवंडी-ठाणे येथे झालेल्या ६९व्या पुरुष गटाचे जेतेपद मिळविलेल्या अहमदनगरने प्रेरित होऊन या स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रौढगट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धा होत आहेत. या अगोदर नाशिक जिल्ह्याने अशा प्रकारे स्पर्धा घेण्याचे ठरविले होते, पण त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने मॅट उपलब्ध झाले नाहीत.
वाडिया पार्क क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक, टिळक रोड, अहमदनगर येथे होणाऱ्या या स्पर्धेत आतापर्यंत पुरुष गटाचे सर्व संलग्न जिल्हे सहभागी होत असत, पण यंदा महिलांचे देखील सर्व संघ सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून हा संघ पुरुष गटात खेळत होता, पण महिला गटात यंदा प्रथमच भाग घेत आहे. या सर्व सहभागी संघाची ६-६ गटात विभागणी करण्यात आली आहे. पुरुषांच्या ब गटात मुंबई शहर, सांगली, रायगड यांच्यात बाद फेरी गाठण्याकरिता चुरस लागणार आहे. महिलांच्या अ व ब गटात देखील हीच स्थिती आहे. महिलांच्या अ गटात पुणे, ठाणे यांना परभणी कडवी लढत देऊ शकते, ब गटात मुंबई शहर, धुळे, सातारा या संघात कोण बाद फेरीत जाणार हे त्याच वेळी समजेल. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत मिळविलेल्या मानांकाप्रमाणे ही गटवारी तयार करण्यात आली असून ती राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी एका पत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली.
स्पर्धेची पुरुष गटविभागणी खालील प्रमाणे.
अ गट : १)अहमदनगर, २)कोल्हापूर, ३)हिंगोली, ४)सोलापूर.
ब गट : १)मुंबई शहर, २)सांगली, ३)रायगड, ४)जळगांव.
क गट : १)धुळे, २)नांदेड, ३)बीड, ४)पालघर.
ड गट : १)मुंबई उपनगर, २)पुणे, ३)परभणी, ४)जालना.
इ गट : १)नाशिक, २)रत्नागिरी, ३)औरंगाबाद, ४)सातारा.
फ गट : १)ठाणे, २)नंदुरबार, ३)सिंधुदुर्ग, ४)लातूर, ५)उस्मानाबाद.
महिला गट विभागणी खालील प्रमाणे.
अ गट : १)पुणे, २)ठाणे, ३)परभणी, ४)हिंगोली.
ब गट : १)मुंबई शहर, २)धुळे, ३)सातारा, ४)जालना.
क गट : १)मुंबई उपनगर, २)औरंगाबाद, ३)नाशिक, ४)लातूर.
ड गट : १)पालघर, २)रत्नागिरी, ३)सोलापूर, ४)उस्मानाबाद.
इ गट : १)कोल्हापूर, २)नांदेड, ३)अहमदनगर, ४)बीड.
फ गट : १)रायगड, २)सांगली, ३)जळगांव, ४)सिंधुदुर्ग, ५)नंदुरबार.

 161 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.