स्वराज बने यांना शौर्य डिफेन्स अकॅडमी मार्फत एनडीए भरतीची पूर्व तयारी करण्याकरिता तसेच लेखी परीक्षा देण्याकरिता अकॅडमीच्या वैशाली म्हेत्रे आणि सुहास भोळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
ठाणे : शौर्य डिफेन्स अकॅडमी ठाणे आणि महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्या स्वराज बने यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सहयोग मंदिर हॉल, घंटाळी, ठाणे येथे शनिवारी सायंकाळी करण्यात आले आहे.
भारतीय सैन्य दलात अथक प्रयत्नाने लेफ्टनंट स्वराज बने हे भरती होऊन एनडीएची ट्रेनिंग पूर्ण करून अधिकारी पदावर आज कार्यरत आहेत. स्वराज बने यांनी शौर्य डिफेन्स अकॅडमी मार्फत एनडीए भरतीची पूर्व तयारी करण्याकरिता तसेच लेखी परीक्षा देण्याकरिता अकॅडमीच्या वैशाली म्हेत्रे आणि सुहास भोळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपला विद्यार्थी भारतीय सैन्यदलात भरती होऊन लेफ्टनंट पदी त्याची निवड झाल्याने लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार समारंभाचे आयोजन सहयोग मंदिर, दुसरा मजला या ठिकाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक चार वाजता करण्यात आले आहे, कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, मेजर प्रांजळ जाधव यांची प्रमुख उपस्थिती असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शौर्य डिफेन्स अकॅडमीच्या वैशाली म्हेत्रे, सुहास भोळे, महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठानचे अमोल कदम, सदाशिव गारगोटे यांनी केले आहे.
24,775 total views, 3 views today