६५ सायकलिस्टनी केली १६० किमी अंतराची सायकल सफारी

सायकलिंग विषयी केली जनजागृती

ठाणे : घोडबंदर परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या वाहतूक कोंडीने घोडबंदर रोडला विळखा घातला आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे याविषयी जनजागृती करण्यासाठी घोडबंदर सायकलिस्ट क्लबने १६० किलोमीटर अंतराची सायकल राईड आयोजित केली होती यात तब्बल ६५ सायकलिस्ट सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी ५ वाजता माजिवडा येथून या सायकल राईडला सुरुवात झाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. जीआरएम १६० असे या राईडचे नाव होते. ग्रुपचे गोपाल साबे पाटील, अजिंक्य कुंकोळकर, प्रतीक सावंत, रैना भटनागर, काके यांच्या संकलपनेतून या राईडचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबई, शहरांतील ६५ सायकल रायडर्स सहभागी झाले होते. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सायकलिंगकचा वापर असा संदेश देखील यावेळी देण्यात आला. ही राईड माजिवडा घाटकोपर – वाशी – उरण फाटा – पनवेल – खोपोली या मार्गे जाऊन पुन्हा बेलापूर वरून ठाणे येथे संपन्न झाली. डीकॅथलोन येथे सर्व रायडर्सचां मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या राईडमध्ये ६८ वर्षीय महेश गुणे तसेच, पाच महिला सहभागी झाल्या होत्या. काही जण पहिल्यांदाच लाँग राईडमध्ये सहभागी झाले होते. या राईड मध्ये सहभागी होऊन आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.

 36,857 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.