ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.३१ टक्के मतदान

जिल्ह्यातील चार तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घोषित झाल्या होत्या. त्यामध्ये ४२ थेट सरपंच पदासाठी तर ३६० सदस्य पदांच्या जागा होत्या.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले.  प्राथमिक अंदाजानुसार सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत  जिल्ह्यात साधारणपणे ८०.३१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
ठाणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घोषित झाल्या होत्या. त्यामध्ये ४२ थेट सरपंच पदासाठी तर ३६० सदस्य पदांच्या जागा होत्या.
नामनिर्देशनपत्रे माघारीनंतर चारही तालुक्यातील मिळून ३५ ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी तर सरपंचपदाच्या ३४ जागांसाठी आज मतदान झाले. त्यामध्ये थेट सरपंच पदासाठी ११४ उमेदवार तर सदस्य पदांच्या २१९ जागांसाठी ६१३ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १३७ मतदान केंद्रांवर आज मतदान झाले.
मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. आज झालेल्या निवडणुकीत एकूण ३० हजार ४१२ स्त्री व ३६ हजार ८४ पुरुष तर इतर ११ मतदार असे एकूण ६६ हजार ५०७ मतदार होते.  त्यापैकी ५४ हजार ४१४ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २४ हजार ८०४ महिला व २८ हजार ६०५ पुरुष आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे.
सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेली तालुकानिहाय आकडेवारी कल्याण ८६.६१ टक्के, शहापूर ७६.८१ टक्के, मुरबाड ८२.५० टक्के, भिवंडीत ७८.९२ टक्के मतदान झाले आहे.

 18,459 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.