सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धावले ठाणेकर

भारतीय जनता पार्टी ,ठाणे शहर,नवयुग मित्र मंडळ,ठाणे महापालिका आणि फिटिस्तान – एक फिट भारत  तर्फे सोल्जरॅथॉन विजय रनचे आयोजन

ठाणे  : अलौकिक शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजय दिवसाचे औचित्य साधून ठाण्यात आयोजित सोल्जरॅथॉन -विजय रनमध्ये  सुमारे २००० हजार ठाणेकर धावले. 
१९७१ च्या भारत – पाक युद्धात भारतीय सैन्याने प्राप्त केलेल्या विजयाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस सैनिकांच्या सन्मानार्थ विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने अलौकिक शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर १७३ ठिकाणी विजय रन आयोजित करण्यात आली होती . त्याचाच एक भाग म्हणुन ठाण्यातील हिरानंदानी मेडोज चौकात  रविवारी पहाटे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर,नवयुग मित्र मंडळ,ठाणे महापालिका आणि फिटिस्तान – एक फिट भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सोल्जरॅथॉन -विजय रन आयोजित करण्यात आली होते.
ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे, ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, ठाणे भाजपाचे उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांच्या पुढाकाराने व फिटिस्तानचे कॅप्टन अवतारसिंग बिंद्रा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनचे उदघाटन भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष,आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,माजी नगरसेवक मनोहर डुंबरे,कृष्णा पाटील,माजी नगरसेविका प्रतिभा मढवी,ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी,उद्योजक मनोज सिंग,आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.या मॅरेथॉनच्या माध्यमातून सुदृढतेचा संदेश देखील देण्यात आला. यावेळी कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकांचा तसेच वायू सेना,आर्मी,नौदलातील माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच यानिमित्त मराठमोळा फॅशन शो देखील आयोजित करण्यात आला होता यामध्ये पारंपरिक वेशभूषा करून महिला व तरुणांनी सहभाग घेतला. 
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांच्या प्रेरणेतुन माजी सैनिकांनी “फिटिस्तान – एक फिट भारत ” ही संस्था सुरु केली आहे.या संस्थेच्या सहकार्याने आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण जागवण्याहेतु तसेच युवा पिढीला नैतिकता, मूल्ये आणि भारतीय सशस्त्र दलांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल प्रवृत्त करण्यासाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ८ या कालावधीत सोल्जरॅथॉनचा हा उपक्रम राबवण्यात आला.आणि याला नागरिकांनी देखील उदंड प्रतिसाद दिला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिटिस्तानचे कॅप्टन अवतारसिंग बिंद्रा ,लालचंद जाधव,चंद्रकांत देसाई,रणजित शिंदे,अभिषेक देशमुख, दिनेश दाभोलकर, राजेश सावंत,शरद कोचर,अखिलेश मिश्रा, विश्वनाथ घाणेकर ,जयसिंग, पवन ठाकूर,राहुल मोदवाडीया,कैलास वडोदरा,मिलिंद साटम,दिनेश बनसोडे,विजय निकम,विठ्ठल कदम,अमित पेडणेकर,प्रशांत मोरे,दीपक तरकाला, नितीन वडोदरा,राकेश बोऱ्हाडे,कृष्णा यादव,वीर बहादूर यादव,जयश्री वडोदरा,पुष्पा शेट्टी,साधना घोटेकर,जयश्री पांडे, आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 9,394 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.