आंबेकर राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेला शानदार आरंभ

स्पर्धेत राज्यभरातील विख्यात १६ संघ‌ भाग घेतला आहे.स्पर्धा बाद पध्दतीने खेळवली जात आहे

मुंबई : गिरणगावातील मैदानी खेळांना उत्तेजन मिळून,गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय-आंतराष्ट्रीयस्तरावर चमक दाखविण्याची संधी मिळावयास हवी,असे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी येथे आंबेकर शुटिंग बॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या ५८ व्या स्मृती प्रित्यर्थ दादरच्या शिवनेरी क्रीडांगणावर राज्य स्तरीय शुटिंग बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन , नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.प्रथम सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्वागतपर भाषण केले.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर,असोसिएशनचे अध्यक्ष श्याम सावंत,असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत,सेक्रेटरी शिवाजी काळे,स्पर्धा संयोजक अशोक चव्हाण, प्रकाश भोसले आदी त्यावेळी उपस्थित होते. नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी विभागात शुटिंग बॉल खेळाला क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन राष्ट्रीय मिल मजदूर संघ गेली अनेक वर्षे क्रीडा स्पर्धा घेऊन जे खेळाडू घडविण्याचे काम करीत आहे,याची आपल्या भाषणात उर्मिला पांचाळ यांनी विशेष प्रशंसा केली.स्पर्धेत राज्यभरातील विख्यात १६ संघ‌ भाग घेतला आहे.स्पर्धा बाद पध्दतीने खेळवली जात आहे.

 412 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.