टॉपसीडेड राहुल, विधी यांनी मारली बाजी

सीसीआय-वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धा
मुंबई : ७७व्या सीसीआय-वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे अव्वल मानांकित राहुल बैठा आणि जनेत विधी यांनी जेतेपद पटकावले.
स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने (एसआरएफआय) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित स्पर्धेच्या अंतिम लढतींमध्ये सीसीआयचे प्रतिभावंत खेळाडू वरुण शाह आणि टियाना परसरामपुरिया यांनी अनुक्रमे १५ वर्षांखालील मुले आणि १९ वर्षांखालील मुली गटात जेतेपद पटकावले.
१६ वर्षांखालील मुले गटात उपांत्य फेरीत पाच गेममध्ये रचित शाह याला हरवणार्‍या वरूण याने अंतिम फेरीत अप्रतिम खेळ करताना दुसर्‍या मानांंकीत ईशान दाबके याच्यावर ११-८, ११-८, ८-११, ११-९ असा विजय मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल वरुण याला सर्वोत्कृष्ट प्रतिभावंत खेळाडूचा पुरस्काराने गौरवण्यात आले.
१९ वर्षांखालील मुली गटात टियाना हिने निरुपमा दुबे हिच्यावर ११-७, ११-८, ११-९ अशी मात केली. दिल्लीच्या टॉप सीडेड विधीने स्टार्ट अ‍ॅकॅडमीच्या बिजली दारवडा हिचे आव्हान ११-३, ११-६, ११-४ असे मोडीत काढले.
पुरुष एकेरीत राहुल याने एकतर्फी लढतीत रवी दीक्षित याच्यावर ११-७ ,११-८, ११-३ अशी मात केली. मुलींच्या १५ वर्षांखालील गटात अव्वल मानांकित सेहर नायर हिने बाजी मारली तरी करिना फिप्स हिने तिला ११-४, १०-१२, ११-२, १७-१५ असे झुंजवले. करिना हिला एएनझेड ग्रींडलेस् बँक सर्वोत्कृष्ट ज्युनियर स्क्वॉश पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
१७ वर्षांखालील मुले गटात पार्थ अंबानी विजेता ठरला. अंतिम फेरीत त्याने टॉप सीडेड ओम सेमवाल याला ११-५, ११-६, ११-५ असे सरळ गेममध्ये हरवले.
११ वर्षांखालील मुले गटातील स्टार्ट अ‍ॅकॅडमीचा विजेता साहील वाघमारे याने सर्वोत्कृष्ट ज्युनियर गटाचा पुरस्कार पटकावला. सीसीआय अध्यक्ष मधुमती लेले आणि उपाध्यक्ष डॅरियस मेहता यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ झाला.

 195 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.