राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

९ डिसेंबरपासून मुंबईतील श्रमिक जिमखान्यात रंगणार पुरुष व महिला गटाच्या लढती.

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” ९ ते १२ डिसेंबर. या कालावधीत “स्थानिक पुरुष व महिला गट स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना व मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मातीच्या ३ क्रीडांगणावर खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत दोन्ही विभागात १२-१२ निमंत्रित संघांना सहभाग देण्यात येणार आहे. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. दोन्ही विभागात समान चषक व रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
अंतिम विजयी होणाऱ्या (दोन्ही गटात) संघाना भव्य चषक व रोख रुपये पन्नास हजार(₹५०,०००/-), तर उपविजयी संघांना चषक व रोख रुपये पंचवीस हजार(₹ २५,०००/-) प्रदान करण्यात येतील. उपांत्य उपविजयी चारी संघांना प्रत्येकी चषक व रोख रुपये अकरा हजार(₹११,०००/-) देण्यात येतील. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट चढाई व पकड तसेच प्रतिदिनीचा मानकरी यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. असे एका परिपत्रकाद्वारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रसार माध्यमाना कळविले आहे. अधिक माहितीकरिता अनिल पाटील ९८६९९७७१६७ किंवा कृष्णा तोडणकर ८९२८४६९७१९ यांच्याशी संपर्क साधावा.

 203 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.