संपूर्ण जग पाहण्यासाठी भारतीय दैनंदिन खर्चात कपात करण्यास तयार: कायक

भारतीयांमध्ये पर्यटनाप्रती पुन्हा जागृत झालेल्या इच्छेसाठी संपूर्ण विश्व पाहणे (६२ टक्के) हे प्रमुख कारण ठरले, ज्यानंतर स्वत:ची स्वप्ने जगणे (६१ टक्के), थरारांचा आनंद घेणे (५५ टक्के), धमाल करणे (४८ टक्के) आणि चिंता दूर करण्यासाठी पर्यटनावर जाणे (४३ टक्के) यांचा क्रमांक होता.

मुंबई : भारत हा उत्सुक प्रवासी असलेला देश आहे असे कायक (KAYAK) या जागतिक अग्रगण्य ट्रॅव्हल सर्च इंजिनच्या नवीन ग्राहक संशोधनामधून निदर्शनास आले. दोन-तृतीयांश (६४ टक्के) भारतीय पर्यटक म्हणतात की ते २०२३ मध्ये संपूर्ण विश्व पाहता येण्यासाठी दैनंदिन खर्च कमी करण्यास तयार आहेत.
YouGov (यूगोव)ने केलेल्या कायक संशोधनाने १,९०० हून अधिक भारतीय प्रवाशांचे सर्वेक्षण केले आणि त्यामधून निदर्शनास आले की, महामारी कारणास्तव प्रवासावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सध्या पर्यटनाप्रती कल वाढला आहे, जेथे तीन-चतुर्थांश (७८ टक्के) प्रतिसादक २०२३ मध्ये पुन्हा पर्यटनावर जाण्यास उत्सुक आहेत.
भारतीयांमध्ये पर्यटनाप्रती पुन्हा जागृत झालेल्या इच्छेसाठी संपूर्ण विश्व पाहणे (६२ टक्के) हे प्रमुख कारण ठरले, ज्यानंतर स्वत:ची स्वप्ने जगणे (६१ टक्के), थरारांचा आनंद घेणे (५५ टक्के), धमाल करणे (४८ टक्के) आणि चिंता दूर करण्यासाठी पर्यटनावर जाणे (४३ टक्के) यांचा क्रमांक होता.
सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ६० टक्के प्रतिसादक स्वत:ला जिज्ञासू पर्यटक मानतात. उत्सुकतेमधून देखील अधिक संपन्न अनुभव मिळतो. ७५ टक्के प्रतिसदकांनी नवीन व ऑफबीट ठिकाणी जात स्वत:ची उत्सुकता पूर्ण केली. ७३ टक्के प्रतिसदकांनी सांगितले की त्यांनी पर्यटनावर फूडचा आस्वाद घेण्याचा नवीन अनुभव घेतला. ७० टक्के प्रतिसादक मागील ट्रिप्सदरम्यान नवीन लोकांना भेटले आणि विभिन्न संस्कृतींमधील मित्र बनवले.
कायक येथील एपीएसीच्या उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक एलिया सॅन मार्टिन म्हणाल्या, “पर्यटकांच्या उत्सुकतेबाबत आम्ही सखोल केलेल्या संशोधनामधून या उत्साहवर्धक निष्पत्ती समोर आल्या आहेत. भारतीय पर्यटक मनसोक्तपणे हॉलिडेजचा आनंद घेण्यासाठी अधिक खर्च करण्यास तयार असण्यासोबत साहसी ट्रिप्सचा आनंद घेण्यासाठी देखील उत्सुक आहे, मग ते स्थानिक पाककलांचा आस्वाद घ्यायचा असो, नवीन संस्कृतींना पाहायचे असो किंवा कमी ज्ञात ठिकाणी जायचे असो. आमच्या डेटामधून निदर्शनास येते की, भारतीय पर्यटक त्यांच्या पर्यटन आठवणींना संपन्न करण्याबाबत अधिक उत्सुक आहेत आणि हीच बाब पुढील वर्षासाठी फ्लाइट शोधांमध्ये झालेल्या २०४ टक्के वाढीमधून दिसून येते. ते पुन्हा एकदा संपूर्ण विश्‍वामध्ये प्रवास करण्याच्या संधीचा लाभ घेत आहेत, तसेच जागरूकपणे उत्तम डील्स व शाश्वत पर्यटन निवडींचा देखील शोध घेत आहेत.’’
भारतीय पर्यटक खर्च व शाश्वतताला प्रमुख प्राधान्‍य देतात
सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी जवळपास निम्‍मे (४९ टक्के) प्रतिसादक महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता अधिक खर्च करण्यासाठी योजना आखत असताना किंवा त्यांच्या पर्यटनासाठी देखील अधिक खर्च करण्यास तयार असताना व्हॅल्यू फॉर मनी इतर घटकांना मागे टाकते. सर्वेक्षण करण्यात आलेल्या भारतीय पर्यटकांपैकी ६० टक्क्यांहून अधिक पर्यटक फ्लाइट्स व हॉटेल्स बुक करताना या बाबीला सर्वाधिक प्राधान्य देतात आणि ८० टक्के पर्यटक वर्ष २०२३ मध्ये पर्यटनासाठी ४ लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी खर्च करण्यास उत्सुक आहेत. यानंतर बुकिंगच्या संदर्भात स्वच्छता व स्थिरता यांचा विचार केला जातो.
भारतीय पर्यटकांच्या हॉलिडे प्लान्ससाठी शाश्वतता हा देखील महत्त्वपूर्ण घटक आहे. ४३ टक्के प्रतिसादक म्हणतात की २०२३ मध्ये त्यांच्या समर हॉलिडेसाठी शाश्वतता प्रमुख निकष असेल. तसेच ४० टक्के प्रतिसादक त्यांच्या शाश्वततेसाठी ओळखले जाणाऱ्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याची योजना आखतात. पृथ्वी व संसाधनांवर किमान परिणाम करणाऱ्या ट्रिप्सचे नियोजन करण्यामधून प्रेरणा घेत सर्वेक्षण करण्यात आलेल्या भारतीय पर्यटकांपैकी ४८ टक्के पर्यटक पर्यावरणास अनुकूल निवास व्यवस्था बुक करतील, तर ४४ टक्के पर्यटक परिवहनाच्या अधिक शाश्वत माध्यमांचा अवलंब करतील.

 129 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.