आयुषी सिंगची धुवांधार फलंदाजी

छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या आयुषीने हल्लाबोल करत ग्लोरिअस क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. आयुषीने क्रितीका यादवच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली.

ठाणे : यष्टीरक्षक असलेल्या आयुषी सिंगने ४६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह कुटलेल्या ५८ धावा आणि आकांक्षा पिल्लईने मिळवलेल्या ३ विकेट्स हे अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत ग्लोरिअस क्रिकेट क्लबवर पय्याडे क्रिकेट क्लबच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. डॉ राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील या सामन्यात पय्याडे क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्ध्यांचा सात विकेट्सनी मोठा पराभव केला.
नऊ खेळाडूनिशी खेळताना ग्लोरिअस क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात ८ बाद ९७ धावा केल्या. आकांक्षा पिल्लईने एका निर्धाव षटकासह १४ धावांत तीन फलंदाज बाद करत ग्लोरिअस संघाला मर्यादित धावांवर रोखण्यात मोलाचे योगदान दिले. नैनिका गोहिल आणि क्रितीका यादवने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. दिक्षा मानरेकरने ३३, दिशा चांडकने नाबाद १९ आणि रिया साळुंखेने १५ धावा बनवल्या.
या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या आयुषीने हल्लाबोल करत ग्लोरिअस क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. आयुषीने क्रितीका यादवच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. या धावसंख्येत सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या आयुषीचा वाटा होता तो ५८ धावांचा. आयुषीच्या दमदार फलंदाजीनंतरही पय्याडे क्रिकेट क्लबला विजयासाठी १८ व्या षटकापर्यंत थांबावे लागले. १७.३ षटकात ३ बाद १०४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. क्रितिकाने १९ धावा केल्या. ग्लोरिअस संघाच्या दिशा चांडक, समृध्दी घारे आणि करुणा सकपाळने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक :
ग्लोरिअस क्रिकेट क्लब : १९.५ षटकात ८ बाद ९७ ( दिक्षा मानेरकर ३३, दिशा चांडक नाबाद १९, रिया साळुंखे १८, आकांक्षा पिल्लई ४-१-१६-३, नैनिका गोहिल ३.५-१७-२, क्रितीका यादव ४-१८-२) पराभूत विरुद्ध पय्याडे क्रिकेट क्लब : १७.३ षटकात ३ बाद १०४ (आयुषी सिंग ५८, क्रितीका यादव १९, दिशा चांडक ३.३- २०-१, समृद्धी घारे ४-१८-१, करुणा सकपाळ ४-२३-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – आयुषी सिंग.

 25,538 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.