यंदा प्रथमच कुमारी गटात सर्व जिल्हे सहभागी

       ४९व्या कुमारकुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर.

     

     परभणी : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत “४९व्या कुमार-कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. माणिकराव गुट्टे क्रीडानगरी, जायकवाडी वसाहती समोर, कोद्री रोड, गंगाखेड, परभणी येथे मातीच्या ६ क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळविण्यात येईल. यंदा प्रथमच कुमारी गटात सर्व संलग्न जिल्ह्या संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. गतवर्षी २३ जिल्ह्याच्या संघांनी महिला गटात सहभाग घेतला होता. गतवर्षी कुमार गटात कोल्हापुरने मुंबई उपनगरला पराभूत करीत जेतेपद मिळविले होते, तर कुमारी गटात पालघरने पुण्याचा पराभव करीत पहिल्यांदाच विजेतेपदाला गवसणी घातली होती. गतवर्षी मिळविलेल्या मानांकानुसार दोन्ही गटातील संघाची ६-६ साखळी गटात विभागणी करण्यात आली आहे. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी ही गटवारी आज एका परिपत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली. गटवारी खालील प्रमाणे:
कुमार गट :- अ गट :- १)कोल्हापूर, २)बीड, ३)मुंबई शहर, ४)उस्मानाबाद.
ब गट :- १)मुंबई उपनगर, २)नंदुरबार, ३)नाशिक, ४)धुळे.
क गट :- १)पालघर, २)सातारा, ३)ठाणे, ४)सिंधुदुर्ग.
ड गट :-  १)परभणी, २)पुणे, ३)जळगाव, ४)जालना.
इ गट :-  १)अहमदनगर, २)रायगड, ३)औरंगाबाद, ४)सोलापूर.
फ गट :-  १)सांगली, २)रत्नागिरी, ३)लातूर, ४)नांदेड, ५)हिंगोली.
 कुमारी गट:- अ गट :-  १)पालघर, २)नाशिक, ३)सोलापूर, ४)जालना.
ब गट :-   १)पुणे, २)नांदेड, ३)कोल्हापूर, ४)उस्मानाबाद.
  क गट :-   १)सांगली, २)रत्नागिरी, ३)बीड, ४)जळगाव.
ड गट :-    १)मुंबई शहर, २)अहमदनगर, ३)सिंधुदुर्ग, ४)हिंगोली.
इ गट :-    १)मुंबई उपनगर, २)ठाणे, ३)लातूर, ४)सातारा.
फ गट :-   १)औरंगाबाद, २)रायगड, ३)परभणी, ४)धुळे, ५)नंदुरबार.

 54 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.