बिगर मानांकित बिजलीने दुसर्‍या मानांकित महकला चकवले

सीसीआय-वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धा – पुरुष एकेरीत राहुलसमोर रवीचे आव्हान

मुंबई : 77व्या सीसीआय-वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीत दुसरी मानांकित महक तलाटी हिला उपांत्य फेरीत बिनसीडेड बिजली दरवडा हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला. अंतिम फेरीत बिजली हिची गाठ अव्वल सीडेड सनेत विधी हिच्याशी पडेल. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित राहुल बैठा याची गाठ रवी दीक्षित याच्याशी पडेल.
सीसीआय स्क्वॉश कोर्टवर झालेल्या गुरुवारच्या सामन्यांत 11 वर्षांखालीrल मुले एकेरी गटात श्याम साटमानी आणि साहिल वाघमारे यांच्यात अंतिम लढत होईल. श्याम याने उपांत्य फेरीत सरळ गेममध्ये विजय मिळविला तरी साहिल याला आर्यन प्रभू याने 11-6, 5-11, 8-11, 11-5, 11-4 असे झुंजवले. मुली गटात अनिका कलंकी आणि मान्या संघवी या दोन अव्वल सीडेड खेळाडूंमध्ये फायनल रंगेल. 13 वर्षांखालील गटांतही मुलींच्या गटात आरिका मिश्रा आणि आद्या बुधिया या दोघी अव्वल मानांकित आमनेसामने आहेत. मुलांमध्ये टॉप सीडेड संघर्ष शाहरासमोर रूद्र पठानियाचे कडवे आव्हान असेल. उपांत्य फेरीत रूद्र याने दुसर्‍या सीडेड अदिव गोळे याला पराभूत केले.
15 वर्षांखालील मुली गटाच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित सेहर नायर हिचा सामना करिना फिप्स हिच्याशी आहे. मुलांच्या गटात दुसरा सीडेड ईशान दाबके याने उपांत्य फेरीचा अडथळा पार केला. अंतिम फेरीत त्याची गाठ वरुण शाह याच्याशी पडेल. वरुण याला रचित शाह याच्याविरुद्ध 11-8, 9-11, 11-7, 7-11, 9-11 असा संघर्ष करावा लागला. 17 वर्षांखालील मुली गटात नाव्या सुंदरराजन विरुद्ध अनाहत सिंग अशी फायनल पाहायला मिळेल. मुले गटात युवराज वाघमारे आणि तवनीत सिंग मुंद्रा ही अव्वल सीडेड जोडी एकमेकांशी झुंजेल.
19 वर्षांखालील मुलींच्या गटात दोन्ही अव्वल मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का बसला. आता अंतिम सामन्यात टियाना परसरामपुरीया हिच्यासमोर निरुपमा दुबे हिचे आव्हान आहे. टियाना हिने दुसरी मानांकित साईशा गुप्ता हिला 11-1, 11-3, 11-6 असे सरळ गेममध्ये हरवले. निरुपमा हिने अव्वल सीडेड सानिया जगी हिच्यावर 11-8, 15-17, 11-9, 6-11, 9-11 असा विजय मिळविला. मुले गटात पार्थ अंबानी आणि टॉप सीडेड ओम सेमवाल यांच्यात फायनल रंगेल. उपांत्य फेरीत पार्थ याने विवान शाह आणि ओम याने सनी यादव याला सरळ गेममध्ये पराभूत केले.
निकाल (उपांत्य फेरी) : पुरुष एकेरी – 1. राहुल बैठा विजयी वि. अविनाश यादव 11-6, 11-2, 11-5. रवी दीक्षित विजयी वि. कुंज रावत 12-10. 11-8 11-3.
महिला एकेरी – बिजली दरवडा विजयी वि. महक तलाटी 11-1, 11-4, 11-1. 19 वर्षांखालील मुली – टियाना परसरामपुरीया विजयी वि. साईशा गुप्ता 11-1, 11-3, 11-6.

 152 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.