ईश्वरी गायकवाडची अष्टपैलू कामगिरी

गोलंदाजीत छाप पाडणाऱ्या ईश्वरी गायकवाडने नाबाद ३८ धावांची खेळी करत संघाला आवश्यक असणारा विजय मिळवून दिला.

ठाणे : ईश्वरी गायकवाडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिंद क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी – ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील सामन्यात सिंद क्रिकेट क्लबने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना २० षटकात ५ बाद ९६ धावांवर रोखले.त्यानंतर गोलंदाजीत छाप पाडणाऱ्या ईश्वरी गायकवाडने नाबाद ३८ धावांची खेळी करत संघाला आवश्यक असणारा विजय मिळवून दिला.
ईश्वरीसह चांदनी कनोजिया आणि साची लोंढेने प्रत्येकी एक फलंदाज बाद करत नॅशनल क्रिकेट क्लबला शतकी धावसंख्येच्या आत रोखले. नॅशनल क्रिकेट क्लबच्या रेनी फर्नांडिस आणि साक्षी गोटेचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.रेनीने ३२ आणि साक्षीने नाबाद राहत ३२ धावा केल्या. उत्तरादाखल सिंद क्रिकेट क्लबने ११व्या षटकांतील पहिल्या चेंडूवर ३ बाद ९७ धावांसह आपला विजय साकारला. ईश्वरी गायकवाडने नाबाद ३८ आणि अनन्या देवळेकर नाबाद १७ धावा केल्या. पूर्वा केंडे, गौरी झेंडे आणि आर्या दवणेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. ईश्वरी गायकवाडला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक-
नॅशनल क्रिकेट क्लब :
२० षटकात ५ बाद ९६ ( रेनी फर्नांडिस ३२, साक्षी गोटे नाबाद २३, ईश्वरी गायकवाड ४-१६-१, चांदनी कनोजिया ४-१७-१, साची लोंढे २-११-१) पराभुत विरुद्ध सिंद क्रिकेट क्लब : १०.१ षटकात ३ बाद ९७ ( ईश्वरी गायकवाड नाबाद ३८, अनन्या नाबाद १७, पूर्वा केंडे ४-३९-१, गौरी झेंडे २-१४-१, आर्या दवणे २-१२-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – ईश्वरी गायकवाड.

 20,782 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.