जोशी – बेडेकर महाविद्यालयाच्या मुलींचे बॉक्सिंग मध्ये १००% यश

खुशी यादव व सायली गावडेने विभागीय स्पर्धा जिंकून राष्ट्रीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मिळवले स्थान

ठाणे : नुकत्याच मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन विभागीय स्पर्धांचे आयोजन कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयात केले होते त्यात ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी खुशी यादव व सायली गावडे हीने विभागीय स्पर्धा जिंकून आपला प्रवेश पक्का केला होता. ह्या स्पर्धांमधून मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठीचा संघ निवडला जाणार होता.
अश्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये खुशी यादव हिने आपले बॉक्सिंगचे कौशल्य दाखवत तिची प्रतिस्पर्धी रंजना राजभर हिच्याहून उजवा खेळ करून देखील ती परीक्षकांवर आपली छाप पडू शकली नाही त्याउलट काहीसा आडदांड खेळ करत रंजनाने ही लढत खिशात घातली. खुशी यादवच्या प्रशिक्षक निशा गायकवाड ने खुशीच्या खेळाबद्दल समाधान व्यक्त केले पण एकंदरच निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते खुशीचे खुबीने विरोधी बॉक्सर्सचे पंच चुकवत खाली जाऊन पोटात पंच मारण्याचे कौशल्य अफाट होते. खुशी यादवला ह्यावेळी कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले.
सायली गावडे तशी नविच बॉक्सर आहे पण तिच्या डावखुऱ्या शैलीने व प्रखर व अचूक ठोस्यानी धमालच उडवून दिली. सायली गावडेची उपांत्य फेरीची लढत मुंबई शहरच्या टीहा परेरासोबत होती. सायलीने टीहाला आपल्या उंचीचा योग्य तो फायदा घेत हातभर लांब ठेवत केवल सरळ पण प्रखर ठोस्याचा वर्षाव करत पंचाना पहिल्याच राऊंड मध्ये लढत थांबवण्यास भाग पाडले.
अंतिम व निर्णायक फेरीच्या सामन्यात सायलीची गाठ मुंबई ऊपनगरच्या इशा तारे बरोबर पडली. ह्या लढतीत देखील सायलीने अत्यंत खुबीने आपल्या उंचीचा व डावखुऱ्या शैलीचा वापर केला. तिची प्रतिस्पर्धी इशा देखील चांगल्या तयारीची होती व तिने सायली समोर टिकाव धरला व ठोस्यास प्रतीठोसा ह्या तत्वाने लढत राहिली. अखेरीस दुसऱ्या फेरीतील सायलीच्या प्रखर आक्रमणाला तोंड न देता आल्यामुळे पंचाना ही लढत दुसऱ्या राऊंड मध्ये थांबवणे भाग पडले. त्याचबरोबर सायलीला वीरश्रीने माळ घातली व तिचे पहिले सुवर्णपदक तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.
ह्या विजयाबरोबर सायली गावडे ही एक इतिहास घडवत जोशी बेडेकर महाविद्यालयची मुंबई विद्यापीठातर्फे राष्ट्रीय अंतर महाविद्यालयीन बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी निवडली गेलेली पहिली मुलगी ठरली. तिची बॉक्सिंगची प्रशिक्षक निशा गायकवाड (बॉक्सिंग प्रशिक्षक राष्ट्रीय प्रबोधिनी) हीने ह्या स्वप्नावर स्वत: बॉक्सर असल्यापासून काम केल्याचे सांगितले. योगायोगाने प्रशिक्षक निशा गायकवाड हिने देखील जोशी बेडेकर महाविद्यालयातच बॉक्सिंगचे धडे गिरवले व आज इतराना प्रशिक्षण देत आहे.

 23,855 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.