योगेश पाटीलच्या प्रभावी मार्‍यामुळे पोलीस जिमखान्याचे वर्चस्व

पोलीस ढाल आमंत्रित क्रिकेट स्पर्धा

मुंबई : मध्यमगती गोलंदाज योगेश पाटील याच्या (२३ धावांत ६ विकेट ) अचूक मार्‍याच्या जोरावर स्पॉन्सर यूपीएल इलेव्हन (युनायटेड फॉस्फरस लि.) संघाला ५६ षटकांत ६ बाद १७३ धावांवर रोखताना यजमान मुंबई पोलीस जिमखाना संघाने ७५व्या पोलीस आमंत्रिम ढाल क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार्‍या मुंबई पोलीस जिमखाना संघाकडून योगेश याने प्रभावी गोलंदाजी करताना यूपीएल इलेव्हनची दाणादाण उडवली. मात्र, उमेश गुजर (५३ धावा) आणि मयूर सानप यांनी (खेळत आहे ४५ धावा) पडझड रोखली. त्यामुळे यूपीएलने पावणे दोनशेपर्यंत मजल मारली.
मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर यांची बॅटिंग
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलीस जिमखाना मैदानावर शुक्रवारी जोरदार बॅटिंग केली. निमित्त होते. ७५ व्या पोलीस आमंत्रिम ढाल क्रिकेट स्पर्धेचे.
पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस जिमखान्याचे अध्यक्ष फणसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस सहआयुक्त (प्रशासक) राजकुमार व्हटकर, अप्पर आयुक्त दिलीप सावंत, झोन वनचे उपायुक्त हरी बालाजी, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक, संयुक्त सचिव दीपक पाटील, कोषाध्यक्ष अरमान मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : यूपीएल स्पॉनर्स इलेव्हन : ५६ षटकांत ६ बाद १७३(उमेश गुजर ५३, मयूर सानप खेळत आहे ४५, योगेश पाटील २३/६) विरुद्ध मुंबई पोलीस जिमखाना संघ.

 193 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.