सांगलीचा सूरज लांडे पुरुष गटाचा कर्णधार,५५ वी पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
उस्मानाबाद : भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने उस्मानाबाद येथे आजपासून सुरू होणार्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जोरदार तयारी केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाला बँक ऑफ महाराष्ट्रने गणवेश पुरस्कृत केले आहे.
आज भारतीय खो-खो महासंघाने स्पर्धेची गटवारी जाहीर केली असून गेल्या वर्षीच्या उपविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाला यजमान महाराष्ट्रात विजेतेपद मिळवण्यासाठी मराठी खेळाडूंचा भरणा असलेल्या रेल्वेला कडवी लढत द्यावी लागेल. तर महिला संघाला भारतीय विमान प्राधिकरण संघाला गेल्या वर्षी प्रमाणे पुन्हा एकदा विजया पासून दुर ठेवण्यासाठी जोरदार नियोजन करावे लागणार आहे.
महाराष्ट्राचे संघ
पुरुष संघ : अनिकेत पोटे, निहार दुबळे, अक्षय भांगरे, ॠषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर); प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले (सर्व पुणे); लक्ष्मण गवस, गजानन शेंगाळ (सर्व ठाणे), सुरज लांडे (कर्णधार), अक्षय मासाळ (सर्व सांगली); रामजी कश्यप (सोलापूर), दिलीप खांडवी (नाशिक), सुरज शिंदे (हिंगोली), सनी नायकवडी (उस्मानाबाद); प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), व्यवस्थापक : नरेंद्र रायलवार (हिंगोली), फिजीओ : डॉ. किरण वाघ (अहमद नगर )
महिला संघ : प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, दिपाली राठोड (सर्व पुणे); रुपाली बडे, पूजा फरगडे, रेश्मा राठाडे (कर्णधार) (सर्व ठाणे); संपदा मोरे, अश्विनी शिंदे, गौरी शिंदे (सर्व उस्मानाबाद); अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे, आरती कांबळे (सर्व रत्नागिरी); प्रतिक्षा बिराजदार (सांगली), प्रिती काळे (सोलापूर); प्रशिक्षक : प्रविण बागल (उस्मानाबाद), व्यवस्थापिका : माधुरी कोळी (ठाणे); सहाय्यक प्रशिक्षक: प्राची वाईकर (पुणे)
308 total views, 1 views today